Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Currency News: घरमालकाला दाखवला चाकू, अन् आत सुरू होता नोटांचा खेळ! नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड

Fake Currency News: नागपूरच्या चैतन्येश्वर नगरातून एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे! भाडे न देणाऱ्या संशयिताच्या घरात ५०० च्या नोटांसारख्या दिसणाऱ्या ८२ लाखांच्या छापलेल्या कागदांचा साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आधीच कारवाई केली असती तर हा प्रकार टळला असता, असा आरोप स्थानिकांनी केला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 26, 2026 | 04:26 PM
Fake Currency News: घरमालकाला दाखवला चाकू, अन् आत सुरू होता नोटांचा खेळ! नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड

Fake Currency News: घरमालकाला दाखवला चाकू, अन् आत सुरू होता नोटांचा खेळ! नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड

Follow Us
Follow Us:
  • नागपुरात ५०० च्या बनावट नोटांसारखे ८२ लाखांचे छापलेले कागद जप्त
  • जुनी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याने संताप
  • पुष्पम बंडाने फरार असून पोलीसांचा शोध सुरू 
 

Fake Currency News: नागपूरमधील चैतन्येश्वर नगरात एका घरात मोठ्या प्रमाणावर नकली नोटांसारख्या छापलेल्या कागदांच्या कथित प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पुष्म बंडाने हा परिसरात कोणाशीही फारसा संपर्क ठेवत नव्हता. विशेष म्हणजे तो घरमालकालाही घराच्या आत येऊ देत नव्हता. अखेर गेल्या अनेक महिन्यांपासून घराचे भाडे थकवल्यामुळे शनिवारी घरमालकाने शेजारील लोकांना व मनसे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घर उघडून पाहिले असता, तिथे ५०० रुपयांच्या अस्सल नोटांसारखे दिसणारे हजारो छापलेले कागद आढळून आले.

हेही वाचा: Washim POCSO Case: धमकी देऊन तब्बल ३ वर्षे अत्याचार! किराणा विक्रेत्याने अल्पवयीन मुलीला केले गरोदर अन्…

नकली नोटा मिसळून व्यवहारात आणत असल्याची शंका

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, ५०० च्या नोटांसारखे दोन्ही बाजूंना छपाई असलेले जवळपास ३७ लाख रुपये मूल्याचे छापलेले कागद आढळून आले. तसेच, नोटांची फक्त एक बाजू छापलेले जवळपास ४५ लाख रुपये मूल्याचे कागदही त्या ठिकाणी सापडले. पुष्म बंडाने याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे कागद का छापले, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याच्या संशयास्पद वर्तणुकीवरून तो मोठ्या प्रमाणावर असलेल्या अस्सल नोटांमध्ये या नकली छापलेल्या नोटा मिसळून व्यवहारात आणत असावा, अशी दाट शंका व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण

बँकेत पैसे भरल्याची पावती अन् पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

घरचे अनेक महिन्यांचे भाडे थकवणाऱ्या पुष्पमने नुकतंच एका बँकेत एक लाख रुपये जमा केल्याची कागदपत्रे त्याच्या घरातून सापडली आहेत. त्यामुळे तो या छापलेल्या कागदांचा वापर नक्की कुठे करत होता? याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, पुष्पम बंडाने अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दुसरीकडे, घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पमने यापूर्वी भाडे देण्याच्या मुद्द्यावरून वाद घालत त्यांना चाकू दाखवून धमकी दिली होती. याची रीतसर तक्रार वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये करूनही पोलिसांनी तेव्हा कोणतीही कारवाई केली नव्हती. जर पोलिसांनी तेव्हाच कठोर पावले उचलली असती, तर हा नकली नोटांचा काळाबाजार तेव्हाच उजेडात आला असता, असा संतप्त सूर स्थानिकांनी लावला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना नागपूरमधील कोणत्या भागात उघडकीस आली?

    Ans: नागपूरच्या चैतन्येश्वर नगरात ही घटना उघडकीस आली आहे.

  • Que: घरात नेमके कशा स्वरूपाचे व किती मूल्य असलेले कागद सापडले?

    Ans: घरामध्ये ५०० च्या नोटांसारखे दोन्ही बाजू छापलेले ३७ लाख व एक बाजू छापलेले ४५ लाख असे एकूण ८२ लाखांचे छापलेले कागद सापडले.

  • Que: या प्रकरणी कोणत्या पोलिसात तक्रार नोंदवली आहे?

    Ans: वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: Nagpur chaitanyeshwar nagar fake currency pushpam bandane crime news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • bank notes
  • Crime . Crime News
  • Fake Currency
  • Nagpur
  • Nagpur Case

संबंधित बातम्या

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार
1

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

Solapur Crime: शिक्षणासाठी आणलेल्या मेहुणीवर बिघडली नियत; अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून जावयाचा भयंकर शेवट!
2

Solapur Crime: शिक्षणासाठी आणलेल्या मेहुणीवर बिघडली नियत; अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून जावयाचा भयंकर शेवट!

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
3

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून
4

Facebook King Murder:’फेसबुक किंग’चा रक्तरंजित अंत! जिमवरून परतताना रील्स पार्टनरनेच भररस्त्यात कारने उडवून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.