Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Repo Rate: गृहकर्जाचा अदृश्य फटका! व्याजदरवाढीमुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट २५ बेसिस पॉईंट्सने वाढवून ५.५० टक्क्यांवर नेल्याची माहिती या बातमीत दिली आहे. व्याजदर वाढल्यास फ्लोटिंग-रेट गृहकर्जधारकांना वाढीव ईएमआय स्वीकारावा लागू शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 22, 2026 | 04:38 PM
RBI Repo Rate: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

RBI Repo Rate: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • RBI चा रेपो रेट ५.५०% वर
  • गृहकर्जाचा कालावधी आणि खर्च वाढण्याची शक्यता
  • कोटक महिंद्रा बँकेच्या हायब्रिड होम लोनचा पर्याय

मुंबई, ऑक्टोबर २०२६: भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच केलेल्या रेपो रेटमधील वाढीमुळे गृहकर्जाचे ईएमआय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रेपो रेट २५ बेसिस पॉईंट्सने वाढवून ५.५० टक्क्यांवर नेण्यात आला आहे, तसेच आरबीआयने आपले धोरणात्मक भूमिकेचे स्वरूप कॅलिब्रेटेड टाइटनिंगकडे वळवले असून व्याजदर चक्रातील बदलाचे संकेत दिले आहेत.

वाढत्या व्याजदरांबाबत बहुतेक चर्चा ईएमआयमधील वाढीवर केंद्रित असली, तरी अनेक कर्जदार एका दुसऱ्या आव्हानाकडे दुर्लक्ष करतात, ते म्हणजे व्याजदर वाढीचा कर्जाच्या कालावधीवर आणि एकूण कर्ज खर्चावर होणारा परिणाम. RBI Repo Rate

सर्वात मोठी आर्थिक जबाबदारी

बहुतेक गृहखरेदीदारांसाठी घर खरेदी करणे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक जबाबदारी असते. डाऊन पेमेंटव्यतिरिक्त त्यांना मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, अंतर्गत सजावट, फर्निचर आणि स्थलांतराचा खर्च यांसारखे अतिरिक्त खर्चही करावे लागतात. परिणामी, घर खरेदी केल्यानंतर पहिली काही वर्षे आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक तणावाची ठरतात.

तरीही, कर्ज मंजूर होताना थोडेसे स्वस्त वाटत असल्याने अनेक कर्जदार फ्लोटिंग-रेट गृहकर्जाची निवड करत राहतात.

व्याजदर वाढतात, तेव्हा फ्लोटिंग-रेट कर्जदारांसमोर प्रामुख्याने दोन पर्याय असतात:
• वाढलेला ईएमआय स्वीकारणे; किंवा
• ईएमआय कायम ठेवून कर्जाचा कालावधी वाढवणे, ज्यामुळे काळाच्या ओघात कर्जाचा एकूण खर्च वाढतो.

नुकतेच व्याजामध्ये झालेल्या वाढीनंतरही रेपो रेट मागील व्याजदर चक्रातील ६.५० टक्क्यांच्या पातळीपेक्षा १०० बेसिस पॉईंट्सने कमीच आहे. यावरून दीर्घ मुदतीच्या गृहकर्जाच्या संपूर्ण कालावधीत व्याजदर मोठ्या प्रमाणात बदलू शकतात हे स्पष्ट होते.

सर्वात संवेदनशील आर्थिक वर्षांचे संरक्षण

वाढत्या व्याजदरांच्या वातावरणात गृहखरेदीदार मार्ग काढत असताना मासिक परतफेडीबाबत अधिक निश्चितता देणाऱ्या सोल्यूशन्सकडे कल वाढत आहे.

Shriram Financial Services: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी श्रीराम ग्रुपची नवी रणनीती; किरकोळ गुंतवणूकदारांवर विशेष लक्ष

व्याजदर आणि ईएमआय

कोटक महिंद्रा बँक हायब्रिड होम लोन पात्र ग्राहकांना त्यांच्या गृहकर्जाचा व्याजदर ३९, ५२ किंवा ६५ महिन्यांसाठी बँकेच्या फ्लोटिंग-रेट गृहकर्जाच्या दराप्रमाणेच स्थिर ठेवण्याची सुविधा देते, ज्यामध्ये हायब्रिड पर्यायासाठी कोणतेही स्वतंत्र अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. निवडलेल्या कालावधीत रेपो रेट वाढला तरीही व्याजदर आणि ईएमआय बदलत नाहीत. हा निश्चित कालावधी संपल्यानंतर हे कर्ज मंजुरीच्या वेळी निश्चित केलेल्या रेपो रेट अधिक पूर्वनिर्धारित स्प्रेडशी जोडलेल्या फ्लोटिंग-रेट संरचनेत रूपांतरित होते.

ईएमआय तुलनेचे उदाहरण: ६५ महिन्यांत १०० बेसिस पॉईंट्स रेपो रेट वाढीचा परिणाम

कर्जाची रक्कम फ्लोटिंग ईएमआय (सुरुवातीचा) फ्लोटिंग ईएमआय (६५ व्या महिन्यात) हायब्रिड ईएमआय (सुरुवातीचा) हायब्रिड ईएमआय (६५ व्या महिन्यात) ६५ व्या महिन्यातील फरक निश्चित कालावधीतील संभाव्य फायदा
₹१ कोटी ₹७४,५५० ₹८२,४५०+ ₹७४,५५० ₹७४,५५० ₹७,९००+ ₹३.४६ लाख
₹७५ लाख ₹५५,९०० ₹६१,८००+ ₹५५,९०० ₹५५,९०० ₹५,९००+ ₹२.५९ लाख

Pension News: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हवी असेल तर त्वरित करा जीवन प्रमाणीकरण, अन्यथा…

उदाहरणादाखल केवळ स्पष्टीकरणासाठी. २५ वर्षांच्या कालावधीसह १ कोटी रुपये आणि ७५ लाख रुपयांचे गृहकर्ज, ७.६० टक्‍के निश्चित व्याजदर, ६५ महिन्यांचा निश्चित व्याजदर कालावधी आणि त्या कालावधीत रेपो रेटमध्ये ५.५० टक्क्यांवरून ६.५० टक्क्यांपर्यंत एकूण १०० बेसिस पॉईंट्सची झालेली वाढ गृहीत धरण्यात आली आहे. ६.५० टक्‍के रेपो रेट हा मागील दर चक्रादरम्यानचा सर्वोच्च स्तर होता. प्रत्यक्ष परिणाम कर्जाची रक्कम, कालावधी, बेंचमार्क बदल, ग्राहकाची पार्श्वभूमी आणि लागू अटी व शर्तींनुसार भिन्न असू शकतात.

कर्जदारांसाठी बहुतांश वेळा आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक तणाव

कोटक महिंद्रा बँकेचे बिझनेस हेड – मॉर्टगेजेस नकुल सक्सेना म्हणाले, “नुकतेच घेतलेला धोरणात्मक निर्णय व्याजदर विविध टप्प्यांमधून जात राहतात याची आठवण करून देणारा आहे. घर खरेदी केल्यानंतर पहिली काही वर्षे कर्जदारांसाठी बहुतांश वेळा आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक तणावाची असतात, कारण नव्या ईएमआयसह अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना ते आपली बचत पुन्हा उभी करत असतात. अशा परिस्थितीत, दर वाढतील की कमी होतील हा मुख्य प्रश्न नसून घरगुती बजेट किती प्रमाणात अनिश्चितता सहजपणे पेलू शकते हा आहे.”

ते पुढे म्हणाले, “कर्ज मंजूर होताना सर्वात कमी व्याजदर मिळवण्यावर अनेक कर्जदारांचा भर असतो. पण, पुढील काही वर्षांत व्याजदर वाढल्यास काय होईल याचाही त्यांनी विचार करायला पाहिजे. परतफेडीच्या निश्चिततेला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी हायब्रिड गृहकर्ज रेपो रेटमधील वाढीमुळे होणारी ईएमआयमधील वाढ आणि कर्जाचा वाढणारा कालावधी या दोन्हीपासून ठराविक कालावधीसाठी संरक्षण देऊ शकते.”

व्याजदर चक्रांमधून जात असताना आजचा सर्वात कमी दर्शनी दर असलेले गृहकर्ज हेच नेहमी सर्वात स्मार्ट पर्याय असेल असे नाही. परवडणारी क्षमता, लवचिकता, निश्चितता आणि दीर्घकालीन खर्च यांचा उत्तम समतोल साधणारे गृहकर्ज सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: RBI चा रेपो रेट किती आहे?

    Ans: रेपो रेट २५ बेसिस पॉईंट्सने वाढवून ५.५० टक्क्यांवर नेण्यात आला आहे.

  • Que: रेपो रेट वाढल्यास गृहकर्जदारांवर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: गृहकर्जाचा ईएमआय वाढू शकतो किंवा ईएमआय कायम ठेवल्यास कर्जाचा कालावधी वाढू शकतो.

  • Que: हायब्रिड होम लोन म्हणजे काय?

    Ans: पात्र ग्राहकांना ठरावीक कालावधीसाठी गृहकर्जाचा व्याजदर स्थिर ठेवता येतो.

Web Title: Rbi repo rate 5 50 percent hybrid home loan emi impact rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Business Man
  • Business News
  • RBI
  • Repo Rate

संबंधित बातम्या

Shriram Financial Services: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी श्रीराम ग्रुपची नवी रणनीती; किरकोळ गुंतवणूकदारांवर विशेष लक्ष
1

Shriram Financial Services: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी श्रीराम ग्रुपची नवी रणनीती; किरकोळ गुंतवणूकदारांवर विशेष लक्ष

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?
2

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?

Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी
3

Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी

Atal Pension Yojana: ४० वयानंतरही पेन्शन मिळवण्याची संधी! सरकारी योजनेत दरमहा भरा ‘इतके’ पैसे
4

Atal Pension Yojana: ४० वयानंतरही पेन्शन मिळवण्याची संधी! सरकारी योजनेत दरमहा भरा ‘इतके’ पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.