Rohini Khadse aggressive over State Women Commission takes action against Pranjal Khewalkar
Rohini Khadse on Women State Commission : पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या चर्चेमध्ये आल्या आहेत. रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई असलेल्या प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यामधील कथित रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडण्यात आले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता यामध्ये राज्य महिला आयोगाने उडी घेतली आहे. यामुळे रोहिणी खडसे यांन राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
प्रांजल खेवलकर हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले असून त्यांना रेव्ह पार्टी प्रकरणासंदर्भात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली आहे. या रेव्ह पार्टीमध्ये मुली देखील सामील असल्यामुळे वाद वाढला आहे. यामुळे राज्य महिला आयोगाने देखील या उडी घेतली असून अहवाल मागवला आहे. राज्य महिला आयोगाने या रेव्ह पार्टीतील मुली आणि हॉटेलवर बोलावण्यात आलेल्या मुलींबाबत अहवाल मागवला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणामध्ये सर्व हॉटेल हे प्रांजल खेवलकर याच्या नावाने सर्व हॉटेल्सच्या रुम बुक करण्यात आल्या होत्या. याशिवाय प्रांजल खेवलकरने 28 वेळा स्वत:च्या नावाने हॉटेल बुक केल्याचे म्हटले असून प्रांजल खेवलकर यांनी परप्रांतीय मुलींना बोलावले होते आणि हे मोठे रॅकेट असू शकते म्हटले आहे. बीडमधील एका बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महिला आयोगाला याबाबत पत्र दिले आहे. आता यावरून रोहिणी खडसे यांनी जोरदार निशाणा हा साधला आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
सोशल मीडियावर पोस्ट करुन शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला आयोगावर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे की, “नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले. मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे,” असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ? राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले ? आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे…,” अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आय़ोग आणि रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.
मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड… pic.twitter.com/t33Ku3aEed
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) August 6, 2025