बर्याच प्रतिक्षेनंतर प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ चित्रपट (Salaar) 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि तो पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांवर डंकीपेक्षा सालारची जादू अधिक झाल्याच दिसत आहे. प्रभासच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करत वर्षातील सर्वात मोठ्या ओपनिंगचा रेकार्ड केला आहे.
[read_also content=”मनी लाँड्रिंग प्रकरणात ट्वि्स्ट, हायप्रोफाइल ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला दिली धमकी; म्हणाला, पर्दाफाश करणार! https://www.navarashtra.com/india/sukesh-chandrasekhar-threaten-to-expose-jacqueline-fernandez-n-monesy-laundring-case-nrps-491400.html”]
अभिनेता प्रभासचा बिगबजेच आदिपुरुष दणक्यात आपटला होता. प्रभासचा साधा लुक प्रेक्षकांना प्रभावित करण्यास कमी पडला. मात्र आता प्रभासने ‘सालार’ चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. त्याच्या रांगड्या लूकने प्रेक्षकांना चांगलचं वेड लावलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उतरला होता. त्यानंतर प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखरे 22 डिसेंबरला चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतल्याचं दिसत आहे. Sacknilk ‘सालार’ नं च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सालार’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 95 कोटींची ओपनिंग केली आहे.
‘सालार’ने ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’सहला ही मागे टाकत रिलीजच्या पहिल्याच दिवशी ९५ कोटींची ओपनिंग केली. या रेकार्डसह प्रभासचा हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.
‘सलार’ने पहिल्याच दिवशी ९५ कोटींची कमाई केली आहे.
जवानाची पहिल्या दिवसाची कमाई 65.5 कोटी रुपये होती.
पठाणने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली.
अॅनिमलची पहिल्या दिवसाची कमाई 54.75 कोटी रुपये होती
KGF Chapter 2 ने पहिल्या दिवशी 53.5 कोटींची कमाई केली होती.
‘सालार’ या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.