Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

सध्या मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आणि आता अशातच आगामी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 09, 2026 | 03:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘अगं अगं सूनबाई!’ चित्रपटामधील नवीन गाणं प्रदर्शित
  • चित्रपट कधी होणार प्रदर्शित ?
  • सासू सुनेची गमतेशीर गोष्ट
 

मराठी संगीतप्रेमींना नेहमीच जुन्या, अजरामर गीतांची भुरळ पडलेली असते. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, मात्र काही गाणी मात्र आपल्या भावनांशी कायमची नाळ जोडून ठेवतात. अशाच अजरामर गीतांना आजच्या काळात, आधुनिक मांडणीत तरीही मूळ आत्मा जपून, नव्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा एक वेगळाच प्रयोग ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. या चित्रपटात चार गाजलेली, जुन्या काळातील लोकप्रिय गाणी नव्या रूपात पाहायला मिळणार आहेत. त्यातील पहिले गाणे ‘दिवस तुझे हे फुलायचे’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कोणत्याही गाण्याच्या मूळ सौंदर्याला किंवा भावनेला धक्का न लावता, त्याच भावनेचा सन्मान राखत हे गाणं पडद्यावर आले आहे. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हा अनुभव खास आणि वेगळा ठरणार आहे.

”एक ह्रदयस्पर्शी..”, दशावतारची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची खास पोस्ट, म्हणाली…

‘दिवस तुझे हे फुलायचे’ या गाण्याचे मूळ संगीत हे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे आहे. हे गाणे आधीच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेले एक अजरामर गीत असून, त्याच्या मूळ सौंदर्याला आणि भावनांना कुठेही धक्का न लावता, आजच्या काळात आणि चित्रपटाच्या कथानकानुसार अतिशय संवेदनशीलतेने सादर करण्यात आले आहे. या गाण्याला बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांचा सुंदर आवाज लाभला असून या गाण्याच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर कुणाल गांजावाला यांनी मराठीत पुनरागमन केले आहे. त्यांचा आवाज या गीताला वेगळीच भावनिक छटा देतो. सूरज धीरज यांच्या संगीतामुळे हे गाणं अधिकच भावपूर्ण झालं असून गीताचे शब्द मंगेश पाडगावकर यांचे आहेत.

 

आई होण्याच्या प्रवासातील आनंद, उत्सुकता आणि हळवे भाव या गाण्यात अतिशय सुंदरपणे मांडण्यात आले आहेत. सुनेच्या गरोदरपणात तिची काळजी घेणे, लाड करणे आणि तिच्यासाठी खास गोष्टी करणे या प्रसंगांतून सासू-सुनेचे नाते अधिक प्रेमळ आणि हळवे झालेले पाहायला मिळते. या आनंदाच्या बातमीमुळे कुटुंबात निर्माण होणारे गोड क्षण, हसू-आनंद आणि भावनांची गुंफण या गाण्यात प्रभावीपणे दिसून येते. यात सासू-सुनेच्या नात्यातील आपुलकी, आधार आणि निखळ प्रेमाचे क्षण पाहायला मिळतात, जे प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी सहज जोडून घेतात. भावनांनी नटलेली दृश्यं, हळवे शब्द आणि सुरेल संगीत यामुळे हे गाणे चित्रपटातील एक महत्त्वाचा भावनिक टप्पा ठरते.

रक्ताने माखलेला चेहरा, अंगभर टॅटू अन्…, शाहिद कपूरचा धडकी भरवणारा ‘ओ रोमियो’ लूक प्रदर्शित

दिग्दर्शक केदार शिंदे या चित्रपटाबद्दल म्हणाले, “मराठी सिनेसृष्टीत आपल्याकडे अफाट सुंदर, अजरामर गाण्यांचा ठेवा आहे. ही गाणी फक्त ऐकण्यापुरती मर्यादित न ठेवता, ती आजच्या प्रेक्षकांपर्यंत नव्या पद्धतीने पोहोचवावी, ही कल्पना मनात होती. जुन्या गाण्यांचा आत्मा, त्यांची भावना आणि ओळख जपणं आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यामुळे कोणताही बदल करताना ‘नवं’ करण्याच्या नादात ‘मूळ’ हरवू नये, याची आम्ही खास काळजी घेतली आहे. या गाण्याबद्दल बोलायचे तर सासू-सुनेच्या नात्यातील प्रेम, काळजी आणि आई होण्याच्या प्रवासातील हळवे क्षण दाखवण्यासाठी यापेक्षा सुंदर गाणं असूच शकत नव्हतं. म्हणूनच या प्रसंगासाठी हेच गाणं निवडलं.”

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे आणि उमेश कुमार बन्सल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: The song divas tujhe he phulayche from the marathi film aag aag sunbai kay mhanta sasubai has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ
1

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
2

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Satish Rajwade: मुंबई पुणे मुंबईच्या प्रेमाची गोष्ट; तरूणाईचा लाडका दिग्दर्शक सध्या काय करतोय?
3

Satish Rajwade: मुंबई पुणे मुंबईच्या प्रेमाची गोष्ट; तरूणाईचा लाडका दिग्दर्शक सध्या काय करतोय?

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.