Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत मोहित कंबोजच्या मालकीची १२ हॉटेल्स, आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी घ्यायचे समीर वानखेडेंची मदत: नवाब मलिक

मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे कंबोज फिरायचा. कंबोजने ११०० कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचे पद मिळाले. या घोटाळ्या प्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झाले, असा दावाही मलिक यांनी केला.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 07, 2021 | 03:37 PM
मुंबईत मोहित कंबोजच्या मालकीची १२ हॉटेल्स, आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी घ्यायचे समीर वानखेडेंची मदत: नवाब मलिक
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई  : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज हे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत असून बॉलीवूड सेलिब्रिटींकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमध्ये समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे साथीदार होते. मुंबईत मोहित कंबोज यांच्या मालकीची १२ हॉटेल्स आहेत. मोहित कंबोज स्वत:च्या हॉटेल्सच्या आसपास असणारी इतर हॉटेल्स बंद पाडण्यासाठी त्यांच्या मालकांना समीर वानखेडे यांच्या माध्यमातून खोट्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकवत असे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.

कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले

नवाब मलिक यानी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरु केले. बास्किन हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले. जेणेकरून कुणाल जानी बास्किन हॉटेल बंद करतील, असा मोहित कंबोज यांचा प्रयत्न असल्याचा आरोप मलिक यांनी केला.

वानखेडेनी मोहित कंबोजची भेट घेतली

मलिक म्हणाले की, आर्यन खानला अटक झाल्यानंतर मी पत्रकारपरिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर ७ ऑक्टोबरला मुंबईतील ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर समीर वानखेडे यांनी मोहित कंबोज यांची भेट घेतली होती. मात्र, या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे याचा व्हीडिओ माझ्याकडे नाही. परंतु, या परिसरातील लोकांनी ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर अशी भेट झाल्याचे सांगितले आहे. समीर वानखेडे यांना या गोष्टीची कुणकुण लागल्यानंतर समीर वानखेडे यांनी घाबरुन मुंबई पोलिसांकडे कोणीतरी माझा पाठलाग करत असल्याची तक्रार केली होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

कंबोज हाच आर्यन किडनॅपिंगचा मास्टरमाइंड

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचाही दावा केला मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबजनक आरोप केला. आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत: गेलाच नाही. त्याला बोलावण्यासाठी प्रतिक गाभा आणि ऋषभ सचदेवने आग्रह केला. हे अपहरण (किडनॅपिंग)चे प्रकरण होते. कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. किडनॅपिंगचा मास्टर माइंड मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. समीर वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो १२ हॉटेल चालवतो असा दावा मलिक यांनी केला.

कंबोजने ११०० कोटी रुपयाचा घोटाळा केला

मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे कंबोज फिरायचा. कंबोजने ११०० कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचे पद मिळाले. या घोटाळ्या प्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झाले, असा दावाही मलिक यांनी केला.

सॅनविल डीसूजा म्हणजे सँम प्रायव्हेट आर्मीचा सदस्य

दरम्यान, पत्रकार परिषदेच्या आधी नवाब मलिक यांनी एक ऑडियो क्लिप ट्वीट केली. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.  यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. या संवादानुसार सँम म्हणजेच सँनविल आहे त्याला जूनमध्ये नोटीस दिली मात्र अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल मलिक यानी केला.

Web Title: Sameer wankhedes help to close 12 hotels owned by mohit kamboj in mumbai nearby hotels nawab malik nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2021 | 03:37 PM

Topics:  

  • Mohit Kamboj
  • Mumbai
  • nawab malik
  • sameer wankhede

संबंधित बातम्या

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
1

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या गोविंदला मिळणार बक्षीस?
2

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या गोविंदला मिळणार बक्षीस?

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका
3

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका

Mumbai Crime: डिलिव्हरी बॉयने सतत बेल वाजवल्याच्या रागातून माथेफिरूकडून हवेत गोळीबार; मुंबईमधील घटना
4

Mumbai Crime: डिलिव्हरी बॉयने सतत बेल वाजवल्याच्या रागातून माथेफिरूकडून हवेत गोळीबार; मुंबईमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.