अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय महिला सरचिटणीसपदी शर्मिला गायकवाड यांची निवड
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय महिला सरचिटणीसपदी शर्मिला गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे आणि उपाध्यक्ष शुभांगी काळभोर (पुणे) यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शर्मिला गायकवाड या उपक्रमशील शिक्षिका असून, त्या पुणे महानगरपालिकेच्या २०२४-२५ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता डीएड, एम.ए., बी.एड., एम.एस्सी. बी.एड. आणि डीएसएम अशी आहे.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (पुणे) यांच्या मार्फत ‘सेतू अभ्यासक्रम’ निर्मितीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच, बृहन महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिका यांच्यामार्फत परदेशी विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका आणि शिक्षक सूचना विकसातही त्यांनी सहभाग नोंदवला आहे.