Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनधिकृत राखी स्टॉल्सवर सामाजिक कार्यकर्त्याचा आक्षेप

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 13, 2021 | 05:33 PM
अनधिकृत राखी स्टॉल्सवर सामाजिक कार्यकर्त्याचा आक्षेप
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : हुतात्मा चौक ते तहसीलदार कार्यालय या दरम्यान फुटपाथवर उभारलेल्या विनापरवाना स्टॉल्सला सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी शुक्रवारी आक्षेप घेतला. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे तक्रार केली आहे. साताऱ्यात करोना संक्रमणाने व्यावसायिकांची आर्थिक दृष्टया कंबर मोडली आहे. याचाच फायदा घेऊन अनधिकृत स्टॉल्सला परस्पर उभारून भाडे वसुलीचा धंदा फोफावला आहे. एसटी स्टॅंड परिसरातील फूटपाथवरच उभारण्यात आलेल्या स्टॉल्सवर माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी आक्षेप घेतला. फुटपाथ उपलब्ध नसल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते अशी तक्रार त्यांनी करत अनधिकृत स्टॉल्स हटविण्याची मागणी केली .

रक्षाबंधन सण हा अवघ्या आठ दिवसावर येऊन पोहोचला आहे . त्यामुळे राजवाडा , पोवई नाका, एसटी स्टँन्ड परिसर येथे राख्यांचे स्टॉल्स दिसून येत आहे . एका पाहणीनुसार शहरात ऐंशी पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून प्रत्यक्षात पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे केवळ सतरा स्टॉल्सची नोंदणी झाली आहे . हे नोंदणी शुल्क दिवसाला दीडशे रुपये आहे . ज्या स्टॉल्सने परवानगी घेतली नाही ते स्टॉल मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे हटविण्याचे संकेत अतिक्रमण हटाव विभागाने दिले आहेत . मात्र हॉकर्स संघटनेचे सातारा शहराध्यक्ष संजय पवार यांनी स्टँन्ड परिसरात चार फूट अंतर सोडून आठ फूट लांबीचे उभारण्यात आलेले स्टॉल्स परवानगी घेऊनच उभारल्यचा दावा प्रसारमाध्यमांकडे केला .

स्टॉल्सचे तीन हजार लाटले कोणी?

सातारा एसटी स्टँन्ड परिसरात उभारलेल्या राखी स्टॉल्सचे आठ दिवसाचे भाडे तीन हजार रुपये असल्याची चर्चा आहे . हॉकर्स संघटनेने कितीही हात झटकले तरी या भागातील राजकीय धेंडांना मोठा हिस्सा गेल्याची कुणकुण आहे . त्यामुळे जागा पालिकेची अन् रूबाब तिसऱ्याचा अशी विचित्र अवस्था आहे . येथे व्यवसाय करायचा तर बिदागी द्यायची हा येथील दंडक आहे.

Web Title: Social worker objection to unauthorized rakhi stalls only seventeen stalls allowed by the municipality nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2021 | 05:33 PM

Topics:  

  • Satara Municipality

संबंधित बातम्या

कराडात 8 तासांत 35 अतिक्रमणे हटवली; पालिकेची धडक कारवाई
1

कराडात 8 तासांत 35 अतिक्रमणे हटवली; पालिकेची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.