Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडात 8 तासांत 35 अतिक्रमणे हटवली; पालिकेची धडक कारवाई

पालिकेने अतिक्रमणांविरोधात घेतलेली ही कारवाई शहरातील वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, पुढील टप्प्यातही अशीच मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 11:07 AM
कराडात 8 तासांत 35 अतिक्रमणे हटवली; पालिकेची धडक कारवाई

कराडात 8 तासांत 35 अतिक्रमणे हटवली; पालिकेची धडक कारवाई

Follow Us
Follow Us:

कराड : शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कराड नगरपालिकेने सोमवारी व्यापक मोहीम राबवत कृष्णा नाका ते बसस्थानक या गजबजलेल्या पट्ट्यात धडक कारवाई केली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखंड सुरू होती. या आठ तासांच्या कारवाईत तब्बल ३५ अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला.

फुटपाथवर उभारलेले हातगाडे, पानपट्ट्या, फळविक्रेते, चहाचे स्टॉल, तसेच रस्त्याकडेला उभारण्यात आलेली सिमेंट-काँक्रीटची कायमस्वरूपी बांधकामेही हटवण्यात आली. या कारवाईमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. या मोहिमेत नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी प्रफुल्ल वनखंडे, नगररचना अभियंता सचिन पवार, अभियंता पुष्कर पाटील, पाणीपुरवठा विभागाचे संदीप रणदीवे, स्वच्छता निरीक्षक सचिन काटकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कराड नगरपालिकेत समित्यांची निवड बिनविरोध; पहिल्याच सभेत स्थायीसह विषय समित्यांवर शिक्कामोर्तब

दरम्यान, पालिकेने अतिक्रमणांविरोधात घेतलेली ही कारवाई शहरातील वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, पुढील टप्प्यातही अशीच मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी यांच्यासह सज्जन जगताप, सिकंदर शेख, मारुती लाटणे, दादासो धडस, विठ्ठल गवळी, स्वप्ना साळुंखे आदींसह १२ पोलिस कर्मचाऱ्यांनी तब्बल नऊ तास सतर्कता राखली.

टप्प्याटप्प्याने कारवाईचा आराखडा

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या देखरेखीखाली शहरातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कृष्णा नाका, विजयदिवस चौक, बसस्थानक, दत्त चौक ते कोल्हापूर नाका या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सोमवारी बसस्थानकापर्यंतचा टप्पा पूर्ण करण्यात आला असून, पुढील दिवसांत उर्वरित भागात मोहीम राबवली जाणार आहे.

डांगेनंतर व्हटकरांचा हातोडा

मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कार्यकाळात फेब्रुवारी 2020 मध्ये कराड शहराने सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम अनुभवली होती. तब्बल दहा ते पंधरा दिवस सुरू असलेल्या या धडक कारवाईची राज्यभर चर्चा रंगली होती. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी पुन्हा एकदा अतिक्रमणांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 35 अतिक्रमणे जमीनदोस्त करून प्रशासनाने आपला इरादा स्पष्ट केला असून, पुढील काही दिवसांत ही मोहीम अधिक व्यापक स्वरूप धारण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून हटवावीत

वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून हटवावीत. अन्यथा पालिकेकडून कठोर कारवाई केली जाईल. फुटपाथ, रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील कोणत्याही अतिक्रमणाला यापुढे मुभा दिली जाणार नाही.

– प्रशांत व्हटकर, मुख्याधिकारी, कराड नगरपालिका.

Web Title: 35 encroachments removed in karad in 8 hours civic body launches swift action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Encroachment Issue
  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

नगरपरिषद शिक्षकांना एनपीएसचा दिलासा, अर्जुन कोळी यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यशस्वी प्रतिसाद
1

नगरपरिषद शिक्षकांना एनपीएसचा दिलासा, अर्जुन कोळी यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यशस्वी प्रतिसाद

Karad News: अरे बापरे! वृक्षारोपण करायला गेले अन्‌ मधमाशांच्या तावडीत सापडले; ४० शाळकरी मुले रुग्णालयात!
2

Karad News: अरे बापरे! वृक्षारोपण करायला गेले अन्‌ मधमाशांच्या तावडीत सापडले; ४० शाळकरी मुले रुग्णालयात!

वाई-पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प
3

वाई-पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प

Satara News : ऐन पावळ्यात मसूर येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांना धरलं जातंय वेठीस
4

Satara News : ऐन पावळ्यात मसूर येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांना धरलं जातंय वेठीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.