Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरपरिषदेने केलेल्या भाडेवाढविरोधात गाळेधारक संघटना आक्रमक

कोरोनामुळे गेली दोन वर्षे व्यवसाय अडचणीत असतानाही बारामती नगरपरिषदेने (Baramati Municipal Council) त्यांच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे वाढविले आहे. उद्योग भवनातील गाळ्यांमध्ये कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नसताना जाचक भाडेवाढ केली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 24, 2021 | 07:03 PM
नगरपरिषदेने केलेल्या भाडेवाढविरोधात गाळेधारक संघटना आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनामुळे गेली दोन वर्षे व्यवसाय अडचणीत असतानाही बारामती नगरपरिषदेने (Baramati Municipal Council) त्यांच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे वाढविले आहे. उद्योग भवनातील गाळ्यांमध्ये कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नसताना जाचक भाडेवाढ केली असून, त्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेणार असल्याचे गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी सांगितले.

बारामती नगरपरिषदेने यापूर्वी २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी १५ टक्के भाडे वाढवले होते. त्रिसदस्यीय समितीने ठरविलेल्या मूल्यांकन दरानुसार ही आकारणी कऱण्यात आली होती. २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी त्रिसदस्यीय समितीने ठरवून दिलेल्या भाडे आकारणीनुसार पालिकेने भाडे आकारणी करण्याचा विषय यापूर्वीच सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे भाडे वाढले असून त्याचा बोजा गाळेधारकांवर पडला आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे व्यवसायाची स्थिती खालावली. त्यात गेली वर्षभर लाॅकडाऊनच्या कारणामुळे गाळे बंदच राहिले. शहरात पालिकेच्या मालकीचे काॅम्प्लेक्स, शाॅपिंग सेंटर, उद्योग भवन,शाहु काॅम्पलेस, गणेश मार्केट भवन आहेत. या गाळ्यांची अवस्था फारशी चांगली नाही. या सर्व इमारती पावसात गळतात. अनेकदा मागणी करूनही वाॅटर प्रुफिंग केलेले नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. सार्वजनिक वीजेची व्यवस्था नाही.

स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नेमण्यात आलेला नाही. कोणत्याही भवनामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. गाळ्यांसमोर छोट्या व्यावसायिकांनी, हातगाडीवाल्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्याचा परिणाम गाळेधारकांच्या व्यवसायावर होतो, अशी स्थिती असताना भाडेवाढ अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

याबाबत गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव म्हणाले, सन २०१३ पासून पालिकेकडून प्रतिवर्षी ५ टक्के भाडे वाढ होत आहे. मागील पंचवार्षिकच्या नगरसेवकांच्या कालावधीत भाडेवाढीचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तहकूब ठेवला होता. कोविड काळात गाळे बंद असतानाही पालिकेने भाडे वाढ केली आहे. यासंबंधी पवार यांची भेट घेणार असून येथील दुरवस्थेची माहिती त्यांना संघटनेकडून देण्यात येणार आहे.

Web Title: Stakeholders association is aggressive against the rent hike made by the baramati municipal council nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2021 | 07:02 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश
1

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश

Pune Bazar Samiti 200 Crore Scam: अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा आरोप
2

Pune Bazar Samiti 200 Crore Scam: अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा आरोप

DYSP Anjana Krushna News: DYSP अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ गांधीगिरी आंदोलन; सोलापुरात नेमंक काय चाललयं?
3

DYSP Anjana Krushna News: DYSP अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ गांधीगिरी आंदोलन; सोलापुरात नेमंक काय चाललयं?

Amol Mitkari’s apology: अंजना कृष्णा प्रकरण अंगलट; अमोल मिटकरींचा बिनशर्त माफीनामा
4

Amol Mitkari’s apology: अंजना कृष्णा प्रकरण अंगलट; अमोल मिटकरींचा बिनशर्त माफीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.