Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Bazar Samiti 200 Crore Scam: अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा आरोप

अजित पवार कडक नेते असून चुकीच्या कामांना ते पाठीशी घालणार नाहीत, अशी आमची भावना आहे. मात्र, बाजार समितीचे सर्व संचालक अजित पवार यांनी सांगितले असे सांगत त्यांच्या नावावर घोटाळे करत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 09, 2025 | 10:00 AM
Pune Bazar Samiti 200 Crore Scam: अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवारांच्या नावाखाली तब्बल २०० कोटींचा भ्रष्ट्राचार
  • बाजार समितीत ४ हजार बोगस परवाने देऊन शेतकर्‍यांची लूट
  • बाजारातील मोकळ्या जागांचा जी ५६ गैरव्यवहार

Rohit Pawar Allegations: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाखाली संचालक मंडळाने गैरकारभार करत तब्बल २०० कोटींचा भ्रष्ट्राचार केला आहे. या घोटाळ्यात अधिकारी सामील असून मंत्रालयापर्यंत हफ्ते दिले जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. बाजार समितीत होणारी शेतकर्‍यांची लूट थांबली पाहिजे. यावर शासनाकडून कार्यवाही न झाल्यास पंधरा दिवसांत मोठे शेतकरी आंदोलन उभारले जाईल. हे आंदोलन अराजकीय असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पवार म्हणाले, बाजार समितीत ४ हजार बोगस परवाने देऊन शेतकर्‍यांना लुटले जात आहे. शेतकर्‍यांशी घेणेदेणे नसलेल्यांना फुलबाजारातील गाळ्यांचे वाटप करत घोटाळा केला आहे. बाजारात अतिक्रमण करत केस कापणार्‍यांपासून गुटखा विक्री करणार्‍यांना जागांचे वाटप केले. पार्किंगच्या नावाखाली शेतकरी व वाहतूकदारांची लूट होत आहे. अधिकृत पावती फक्त दहा रुपयांची दिली जाते, मात्र प्रत्यक्षात २०० ते ३०० रुपयांपर्यंत रक्कम वसूल केले जात असून यामध्ये संचालकांचा सहभाग आहे. रोजंदारी कर्मचार्‍यांची भरती करून पुन्हा घोटाळा करण्याचा विचार सुरू आहे. माथाडी कायद्याचा गैरवापर केला जात आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि कामगार वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे. शासनाने याप्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार संचालकांवर कठोर कारवाई करावी.

Ayush komkar Case update: पुण्यातील आयुष कोमकरची हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आंदेकर टोळीच्या सात जणांना अटक

अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी

अजित पवार कडक नेते असून चुकीच्या कामांना ते पाठीशी घालणार नाहीत, अशी आमची भावना आहे. मात्र, बाजार समितीचे सर्व संचालक अजित पवार यांनी सांगितले असे सांगत त्यांच्या नावावर घोटाळे करत आहेत. शेतकर्‍यांच्या हक्काचा पैसा लाटून भ्रष्टाचार करणार्‍यांना संरक्षण देण्यासाठी अजित पवार यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे संचालक मंडळाची तुम्ही पाठराखण करत आहात का हे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे रोहित पवार यांनी नमूद केले.

जी ५६ मधून घुले परिवाराला अवैध भाडे

बाजारातील मोकळ्या जागांचा जी ५६ गैरव्यवहार झाला आहे. अजित पवार गटाचे संचालक गणेश घुले व त्यांचे चिरंजीव गौरव घुले यांनी बाजार समितीच्या ५६ जागा चुकीच्या पध्दतीने काही लोकांना दिल्या आहेत. यापोटी महिन्याला दीड ते २ कोटी रूपये भाडे अवैध पध्दतीने घुले परिवाराला दिले जाते आहे. याला जी ५६ म्हटले जाते, असा आरोप पवार यांनी केला.

बीड-नगर रेल्वेला अखेर मुहूर्त मिळाला; 17 सप्टेंबरला धावणार रेल्वे, नागरिकांना मोठा फायदा होणार

मंत्रालयापर्यंत पाकिटे अन् भ्रष्ट्राचारात सहभागीच चौकशी समितीचे प्रमुख

बाजार समितीच्या भ्रष्ट्राचाराचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीची घोषणा पणनंमत्र्यांनी केली. मात्र, पणन आणि मंत्रालयातील अधिकार्‍यापर्यंत पैशांची पाकीटे पोहचल्याने यावर काही झाले नाही. तर यापुर्वी नेमलेल्या चौकशी समितीत भ्रष्ट्राचारात सहभागी असलेले जिल्हा उपनिब्ंधक जगताप यांची निवड केली आहे. त्यामुळे पाकिटाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला.

Web Title: Rs 200 crore scam in pune market committee under ajit pawars name rohit pawar alleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • ajit pawar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

“रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे…ही अपरिपक्वतेची लक्षणे; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं भडकले का?
1

“रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे…ही अपरिपक्वतेची लक्षणे; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं भडकले का?

DYSP Anjana Krushna News: DYSP अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ गांधीगिरी आंदोलन; सोलापुरात नेमंक काय चाललयं?
2

DYSP Anjana Krushna News: DYSP अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ गांधीगिरी आंदोलन; सोलापुरात नेमंक काय चाललयं?

Amol Mitkari’s apology: अंजना कृष्णा प्रकरण अंगलट; अमोल मिटकरींचा बिनशर्त माफीनामा
3

Amol Mitkari’s apology: अंजना कृष्णा प्रकरण अंगलट; अमोल मिटकरींचा बिनशर्त माफीनामा

Sanjay Raut News: “नैतिकता पाळायची म्हटलं तर ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल’; संजय राऊतांची जहरी टीका
4

Sanjay Raut News: “नैतिकता पाळायची म्हटलं तर ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल’; संजय राऊतांची जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.