T20 World Cup 2024 Victory Parde : मुंबई क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी संध्याकाळी भारताच्या T20 विश्वचषक विजय परेडसाठी वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना विनामूल्य प्रवेशाची परवानगी दिली आहे. पंतप्रधान मोदींची भेटीनंतर टीम इंडियाचे मुंबईत आगमन झाले. बीसीसीआयने नरिमन पॉइंट ते वानखेडे या 1 किमीच्या विजय परेडची व्यवस्था केली आहे, त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एक छोटा समारंभ आयोजित केला आहे.
टीम इंडियाची विजयी यात्रा सुरू झाली आहे. भारतीय संघाचे खेळाडू विजय रथावर स्वार झाले आहेत. टीम इंडिया मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघाली आहे.
विक्रमी गर्दी, आज मुंबईच्या रस्त्यावर चाहत्यांनी सर्व विक्रम मोडले
𝙎𝙀𝘼 𝙊𝙁 𝘽𝙇𝙐𝙀! 💙
From #TeamIndia to the fans, thank you for your unwavering support 🤗#T20WorldCup | #Champions pic.twitter.com/GaV49Kmg8s
— BCCI (@BCCI) July 4, 2024
Rohit Sharma seems to have no plans of getting a second child atp; the trophy is his literal baby 🥹😍 pic.twitter.com/AUn4mQkkaJ
— Sravani࿐ (@pullshotx45) July 4, 2024
विजयाच्या परेडपूर्वी हार्दिक पांड्याने X वर पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने ट्रॉफीसोबत एक फोटो पोस्ट करत लिहिले की, लवकरच भेटू, वानखेडे.
See you soon, Wankhede ☺️ pic.twitter.com/lHOKvYdEqh
— hardik pandya (@hardikpandya7) July 4, 2024
टीम इंडियाचे खेळाडू हळूहळू बसमधून मरीन ड्राईव्हकडे जात आहेत. चाहत्यांची गर्दी पाहता विजयी परेड सुरू होण्यास बराच वेळ लागेल असे वाटते.
टीम इंडियाचे खेळाडू काही वेळापूर्वी मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसले होते. मुंबईतील नरिमन पॉइंट येथून परेडला सुरुवात होईल. जो वानखेडे स्टेडियमपर्यंत जाईल. भारतीय संघाचे मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सध्या संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. लाखो चाहत्यांनी टीम इंडियाच्या बसला घेराव घातला आहे. टीम इंडियाची विजयी परेड संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंतही ते सुरू होऊ शकले नाही.
भारतीय संघाचे खेळाडू मुंबई विमानतळाबाहेर आले आहेत. विमानतळाबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी झाली आहे. हार्दिक पांड्याच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी फिरवताना दिसत होता. इथून खेळाडूंना बसने नरिमन पॉइंटवर नेण्यात येईल, तेथून टीम इंडियाची विजयी परेड सुरू होईल.
टीम इंडियाच्या विस्तारा फ्लाइट ‘UK1845’ ला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट देण्यात आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या विमानाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या आणि पाण्याचा फवारा मारला.
Water Salute given to Rohit Sharma led team India flight in Mumbai Airport 🫡❤️#VictoryParade#IndianCricketTeam pic.twitter.com/MhASFpfIQB
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) July 4, 2024
चाहते टीम इंडियाची वाट पाहत आहेत मुंबईच्या रस्त्यांवर चाहते टीम इंडियाचा जल्लोष करत आहेत. जय हिंदच्या घोषणा दिल्या जात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मुंबईत पोहोचला आहे. पण अजून चाहत्यांसमोर आलेले नाहीत.
Sea of Blue waving flags! 🇮🇳🌊#Whistle4Blue #T20WorldCup
📸 Getty Images pic.twitter.com/5IxEZJpwMH— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 4, 2024
04 Jul 2024 11:22 PM (IST)
WHAT A GREAT Movement खरंच डोळ्यात साठवून ठेवण्याचा क्षण, समारंभाला अंतिम स्वरुप प्राप्त होताना, टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला. त्यानंतर गाण्यावर रोहित शर्मा- विराट कोहलीनंतर पूर्ण टीम इंडिया थिरकली.
04 Jul 2024 09:07 PM (IST)
वानखेडेच्या मैदानावर काही वेळांमध्येच हा सोहळा सुरू होणार आहे. पोलिसांसाठी दिव्य असलेली ही कामगिरी मुंबई पोलिसांनी करून दाखवली आहे.
04 Jul 2024 09:06 PM (IST)
वानखेडे स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांची तुडुंब गर्दीने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आज गर्दीने उच्चांक गाठल्याने ही खरी तर पोलिसांची परीक्षा होती. त्यामुळे एवढ्या गर्दीतून बस काढणे म्हणजे पोलिसांसमोर दिव्यच होते. ते मोठे काम पोलिसांनी करून दाखवले आहे.
04 Jul 2024 08:26 PM (IST)
आज मरीन ड्राईव्ह वरील गर्दीने उच्चांक गाठला. क्रिकेट चाहत्यांनी आज मोठ्या जल्लोषात स्वागत केले. तर एवढी मोठी गर्दी पाहून खेळाडू सुद्धा भारावले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीनी ही ट्रॉफी उंचावली.
04 Jul 2024 08:16 PM (IST)
टी-20 विश्वचषक 2024 ची विजयी मिरवणुकीत मुंबईकर चाहत्यांनी गर्दीचा उच्चांक गाठला. आज क्रिकेटप्रेमींनी या रेकॉर्डब्रेक गर्दीने विक्रम गाठला.
04 Jul 2024 08:07 PM (IST)
एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहते पाहिल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सुद्धा सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
04 Jul 2024 08:05 PM (IST)
टी-20 विश्वचषक विजयी मिरवणुकीसाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी रस्त्यावर जमलेले पाहायला मिळाले. प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने बसला वानखेडेपर्यंत पोहचण्यास उशीर लागणार असल्याचे पाहायला मिळत होते. हार्दिककडे विश्वचषकाची ती ट्रॉफी पाहायला मिळत आहे.
04 Jul 2024 06:57 PM (IST)
नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिमय असा विजयी रॅलीचा मार्ग असणार आहे. सजवलेल्या बसमधून टीम इंडिया वानखेडेपर्यंत प्रवास करणार आहे. प्रचंड मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी आणि चाहते जमलेले आहेत. नरिमन पॉईंटवर उभ्या असलेल्या सजवलेल्या ओपन बसमधून टीम इंडिया प्रवास करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अगोदरच क्रिकेटप्रेमी, चाहते, मैदानावर तर आहेतच परंतु या रोडवर मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत उभे आहेत.
04 Jul 2024 06:53 PM (IST)
टीम इंडियाचे फायर ब्रिगेडकडून विशेष मानवंदना दिल्यानंतर तेथे केक कापण्यात आला. त्यानंतर एका बसमधून टीम इंडिया नरिमन पॉईंट येथे येणार आहे. तिथून पुढे ते खास बस मधून वानखेडे स्टेडियममध्ये दाखल होणार आहे.