रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. युक्रेनने दावा केला आहे की त्यांच्या सैन्याने ८०० हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. ३० रशियन रणगाडे आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत. तर, गुरुवारी रशियन सैन्यानं चेर्नोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांटजवळ हल्ले केले. त्याचा परिणाम आता तेथील मानवी वस्तीवर होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या अणुप्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी वाढली आहे. त्यामुळे युक्रेनच्या चिंतेत आता भर पडली आहे.
[read_also content=”रशियन हल्ल्याचा दुसरा दिवस, युद्धात 800 हून अधिक रशियन सैनिक ठार, 30 टँक आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट युक्रेनचा दावा https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/ukraine-claims-second-day-of-russian-offensive-more-than-800-russian-soldiers-killed-30-tanks-and-7-spy-planes-destroyed-244895.html”]
गुरुवारी रात्री रशियन सैन्याने युक्रेनच्या चेर्नोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांटजवळ हल्ले केले. येथे अनेक स्फोटही झाले. त्यामुळे या अणुप्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी वाढली आहे. युक्रेनच्या न्यूक्लियर एजन्सीने याला दुजोरा दिला आहे. किरणोत्सर्गाच्या वाढत्या पातळीमुळे या भागात राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांना आरोग्याच्या समस्या देखील असू शकतात. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती ठेवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले.
[read_also content=”युक्रेनमध्ये नवी मुंबईतील एमबीबीएसचा विद्यार्थी अडकला! सरकारला मदतीचं आवाहन https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mbbs-student-from-navi-mumbai-stuck-in-ukraine-appeal-to-the-government-for-help-nrps-245130.html”]