नागपूर (Nagpur). चंद्रपुरातील दारूबंदी (the liquor ban) हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition in the Assembly) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
[read_also content=”अमरावती/ धरणात आढळला मृत माशांचा खच; हजारो माशे मरण पावल्याने परिसरात एकच खळबळ https://www.navarashtra.com/latest-news/dead-fish-found-in-dam-a-single-commotion-in-the-area-as-thousands-of-fish-died-nrat-134633.html”]
राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.