Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊर्जा स्वावलंबी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन, उद्योग, तंत्रज्ञान संस्था, संशोधन केंद्रे आणि शेतकरी यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 16, 2026 | 12:58 PM
Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Follow Us
Follow Us:
  • सौर ऊर्जा  महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची मास्टर की
  • शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज
  • भविष्यात उद्योगांसाठी ओपन ॲक्सेस सुलभ करणे, ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यावर भर
CM Devendra Fadnavis: “सौर ऊर्जा ही केवळ पर्यावरणपूरक पर्याय राहिलेली नसून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची, ऊर्जा सुरक्षिततेची आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी मास्टर की ठरली आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पुण्यात आयोजित सातव्या ‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६’चे उद्घाटन त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. यावेळी त्यांचा संदेश ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात प्रदर्शनस्थळी प्रसारित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने गेल्या २५ वर्षांत अक्षय ऊर्जा क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक केले. सौर पॅनल उत्पादक, इन्व्हर्टर निर्माते, स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि ईपीसी कंपन्यांना एकत्र आणून उद्योगविश्वासाठी सक्षम व्यासपीठ उभारल्याबद्दल त्यांनी मास्माचे अभिनंदन केले. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया’ या दृष्टिकोनाला या उद्योग संघटनेमुळे बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

राज्यात एशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवला जात असून यावर्षाअखेर १६ गिगाव्हेट सौर ऊर्जा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वच्छ, शाश्वत आणि भविष्योन्मुख ऊर्जा व्यवस्थेकडे महाराष्ट्राने टाकलेले पाऊल जागतिक पर्यावरणीय उद्दिष्टांनाही पूरक ठरणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज, उद्योगांना परवडणाऱ्या दरात वीज आणि एमएसएमई क्षेत्राला ऊर्जा खर्चात बचत यासाठी सौर ऊर्जेचा विस्तार हा विकासाचा मुलाधार ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्य शासनाने सौर ऊर्जा धोरण, रूफटॉप सौर प्रोत्साहन योजना, पीएम सूर्यघर योजना, पीएम कुसुम योजना, सौर उद्याने, ऊर्जा साठवण प्रकल्प आणि ग्रीन एनर्जी कॉरिडॉर यांच्या माध्यमातून अक्षय ऊर्जेला गती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात उद्योगांसाठी ओपन ॲक्सेस सुलभ करणे, ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देणे, सौर ऊर्जा साठवण तंत्रज्ञान विकसित करणे आणि तरुणांसाठी ग्रीन जॉब्स निर्माण करणे यावर शासन विशेष भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

ऊर्जा स्वावलंबी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन, उद्योग, तंत्रज्ञान संस्था, संशोधन केंद्रे आणि शेतकरी यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मासमासारख्या उद्योग संघटनांची भूमिका धोरणात्मक भागीदार म्हणून अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उद्घाटन कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, नगरसेविका मंजुषा खेडेकर, स्वातंत्रवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर, जर्मन इंडो इनोवेशन कॉरिडोर (GIIC) चे संस्थापक उपेंद्र बर्वे, मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रदीप खाडे आणि माजी अध्यक्ष शशिकांत वाकडे उपस्थित होते. मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६ ला नागरिक, ग्राहक, उद्योग प्रतिनिधी आणि उद्योजक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध सौर उपकरणांच्या स्टॉल्सना ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात भेटी देत माहिती घेतली आणि खरेदीही केली.

तीन दिवसांच्या या प्रदर्शनाने महाराष्ट्राच्या अक्षय ऊर्जा प्रवासाला नवी दिशा आणि नवे बळ दिल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. “उज्वल, हरित आणि ऊर्जा संपन्न भविष्यासाठी” शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशाचा समारोप केला.

 

Web Title: Cm devendra fadnavis solar energy is the master key to maharashtras progress chief minister inaugurates masma expo in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Marathi News
  • Pune Politics
  • solar energy

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Young Innovators India: COP26 गाजवणारी १५ वर्षांची विनिषा उमाशंकर कोण आहे? तिच्या ‘सोलर इस्त्री गाडी’ने जगाला कसं थक्क केलं?
3

Young Innovators India: COP26 गाजवणारी १५ वर्षांची विनिषा उमाशंकर कोण आहे? तिच्या ‘सोलर इस्त्री गाडी’ने जगाला कसं थक्क केलं?

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
4

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.