Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुली, महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीचा दया अर्ज नाकारावा, उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची राष्ट्रपतींना विनंती

एकीकडे देशात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभे होत असताना आता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक विनंती केली आहे. जाणून घेऊया ही विनंती त्यांनी कश्याबद्दल केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 04, 2024 | 08:26 PM
अल्पवयीन मुली, महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीचा दया अर्ज नाकारावा, उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची राष्ट्रपतींना विनंती

अल्पवयीन मुली, महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीचा दया अर्ज नाकारावा, उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची राष्ट्रपतींना विनंती

Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशात अशा अनेक घटना घडल्या आहे ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थति होताना दिसत आहे. अनेक जणांकडून महिलांचे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होताना दिसत आहे. यातच आता उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती मुर्मू यांना एक महत्वपूर्ण विनंती केली आहे.

महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातील गुन्ह्यांबाबत ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एका निवेदनाद्वारे केली.

हे देखील वाचा: “मविआ सरकारच्या वेळी भाजपाने तीन…”; एसटी संपावरून विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका

राष्ट्रपती मुर्मू यांची विधान परिषदेचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबईतील राजभवन येथे भेट घेतली. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना महिलांवरील अत्याचार आणि उपाययोजना संदर्भात निवेदन सादर केले आहे.

अल्पवयीन मुली आणि महिलांसोबत गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांना अनेकदा फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर गुन्हेगार दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे देत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींकडून आलेले दयेचे अर्ज अनेकदा प्रलंबित राहतात आणि त्यामुळे फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करता येत नाही. यासाठी अशा गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारला जावा, अशी विनंती उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे.

तसेच निकाल लागेपर्यंत होणारा विलंब कमी करण्यासाठी भारतातील महिला संघटनांनी एक मागणी केली आहे. गृह विभाग, विधी व न्याय विभाग या दोन्हीच्या समन्वयाने खटले तातडीने निकालात लागावेत, यासाठी कमिशनर ऑफ विमेन राइट्स म्हणजे महिलांच्या संदर्भातले आयुक्त हे विधी व न्याय विभागाचे नेमावे, अशी विनंतीही डॉ. गो-हे यांनी यावेळी केली आहे.

महिला बालविकास, आदिवासी विभाग, शिक्षण विभाग आणि सामाजिक न्याय विभागाद्वारे वसतीगृहे सुरू आहेत. येथे नियमन करणारे अधिकारी वर्ग आणि त्याच्याशी संबंधित अधिकारी वर्ग, राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांना दंड संहितेबद्दलची माहिती आणि अंमलबजावणी संदर्भात माहिती मिळावी, यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावे. असेही या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अल्पवयीन महिला आणि मुली यांच्यावर होणाऱ्या बलात्कार आणि खून करून नंतर दयेचे अर्ज करणाऱ्या गुन्हेगाऱ्यांच्या मानसिकतेबद्दलची नापसंती व्यक्त केली. उपसभापती यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करून निर्णय घेणार असल्याचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना सांगितले.

Web Title: The mercy petition of the execution of criminals regarding minor girls women should be rejected deputy chairman dr gorhes request to the president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 08:25 PM

Topics:  

  • dr. Neelam Gorhe
  • Draupadi Murmu

संबंधित बातम्या

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेवरुन नीलम गोऱ्हेंचं शिवेंद्रराजेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी
1

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेवरुन नीलम गोऱ्हेंचं शिवेंद्रराजेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण
2

Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

काँग्रेस नेते नाना पटोले यांचं राष्ट्रपतींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी
3

काँग्रेस नेते नाना पटोले यांचं राष्ट्रपतींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

राष्ट्रपतींनी मांडली तब्बल 14 प्रश्नांची प्रश्नावली; मात्र सुप्रीम कोर्ट देणार का उत्तर सगळी?
4

राष्ट्रपतींनी मांडली तब्बल 14 प्रश्नांची प्रश्नावली; मात्र सुप्रीम कोर्ट देणार का उत्तर सगळी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.