• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Opposition Leader Vijay Vadettiwar Criticized On Bjp And Government About St Employee Protest

“मविआ सरकारच्या वेळी भाजपाने तीन…”; एसटी संपावरून विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन गुन्हे घडले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे असा , घणाघाती हल्लाबोल प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2024 | 08:03 PM
''मविआ सरकारच्या वेळी भाजपाने तीन हस्तक ...''; एसटी संपावरून विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका

विजय वडेट्टीवार (फोटो- ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन गुन्हे घडले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा घणाघाती हल्लाबोल प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर व ग्रामीण, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, CWC सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा, पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलाश कदम, आ. संग्राम थोपटे, आ. रविंद्र धंगेकर, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी चेन्नीथला पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले, ”पुणे शहर आय. टी. हब आहे पण शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. रस्त्यावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण बनले आहे. याचा आय. टी. कंपन्यांना फटका बसत आहे. आतापर्यंत १२० मतदारसंघातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. संघटन मजबूत करण्याचा हा कार्यक्रम असून जनतेमध्ये जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती पोहचवण्याचे काम केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने मविआला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे सरकार काम करते तर मग एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आलीच का? या सरकार मध्ये कामे कोणाची होत आहे? महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे राजकारण भाजपने केले होते. भाजपच्या नेत्यांनी मुद्दाम राजकारण करून संप भडकवण्याचे काम त्यावेळी केले. आज राज्यात… — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 4, 2024

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ”पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे, दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केल्या जात आहेत. सरकार व पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. पोलीस आयुक्त, डीसीपी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शिपाई या सर्व पदांची पैसे घेऊन पोस्टिंग केली जात आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीच पोस्टींग चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहराला कलंक लावणाऱ्या घटना घडत आहेत. राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पुर्व विदर्भात धान, कापसाचे पिक वाया गेले. आता मराठवाडा व विदर्भातील काही भागातील सर्व पिके नष्ट झाली आहेत. शेतकरी व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली पण मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात मदत काही पोहचत नाही. एमपीएससीच्या मुलांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारने अद्याप केलेली नाही. ससून रुग्णालयासमोरची रस्ते विकास महामंडळाची सव्वादोन एकर जागा कवडीमोल भावाने दिली आहे. या जागेवर कॅन्सर हॉस्पिटल होणार होते, ५०० कोटी रुपये बाजार भाव असलेली ही जागा ९० वर्षांच्या लिजवर ७० कोटी रुपयांना दिली आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटणार का? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवली तातडीची बैठक

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, महायुती सरकारने मुंबई विकली, महाराष्ट्राची अस्मिता गुजरात दरबारी गहाण ठेवली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला व गुजरातमधील ड्रग राज्यात आणले जात आहे. पुण्यात ड्रग्ज व गोळीबार नेहमीचेच झाले आहे. पुण्याची संस्कृती नष्ट केली आहे. टेंडर काढा व कमीशन खा एवढेच काम सरकार करत आहे. दोन दिवसापासून एस.टी. चा संप सुरु आहे. मविआ सरकार असताना एसटीच्या संपात राजकारण केले गेले. एस.टी. मंहामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी केली होती. संप चिघळवण्यासाठी भाजपाने तीन हस्तक या संपात घुसवले होते, ते आता कुठे आहेत, विलीनीकरण का केले जात नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

Web Title: Opposition leader vijay vadettiwar criticized on bjp and government about st employee protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 07:59 PM

Topics:  

  • BJP news
  • Maharashtra Government
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
1

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 
2

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक

Jan 03, 2026 | 08:00 AM
देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी

देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी

Jan 03, 2026 | 07:17 AM
Paush Purnima 2026: पौष पौर्णिमेला या वस्तूंचे दान करणे असते शुभ, घरात धन आणि समृद्धीचे होईल आगमन

Paush Purnima 2026: पौष पौर्णिमेला या वस्तूंचे दान करणे असते शुभ, घरात धन आणि समृद्धीचे होईल आगमन

Jan 03, 2026 | 07:05 AM
सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर

सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर

Jan 03, 2026 | 04:15 AM
मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Jan 03, 2026 | 01:15 AM
Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Jan 02, 2026 | 10:40 PM
Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Jan 02, 2026 | 10:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.