Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनावर गुळवेल ठरतेय अमृत; ग्रामीण भागात वनस्पतीला मोठी मागणी

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 04, 2021 | 12:05 AM
कोरोनावर गुळवेल ठरतेय अमृत; ग्रामीण भागात वनस्पतीला मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

संजय बयस
शिरपूर जैन (Shirpur Jain).  कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. गुळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंब गुळवेलचा काढा घेण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे गुळवेल वनस्पतीला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

[read_also content=”Corona Alert/ नागपुरात कोरोनामुळे ७६ जणांचा मृत्यू; नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन https://www.navarashtra.com/latest-news/76-killed-in-nagpur-corona-appeal-to-citizens-to-abide-by-the-rules-nrat-123848.html”]

गुळवेलाचा काढा सेवन केल्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, मळमळ, मुळव्याध, सांधेदुखी, आम्लपित्त, पोटदुखी, मधुमेह आटोक्यात येतो. असे जाणकारांकडून सांगितले जाते. त्याचप्रमाणे डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू यासारख्या आजारावर गुळवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागात त्याची मागणी वाढत आहे. ग्रामीण भागात कडुनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गुळवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. विशेषकरून कडुनिंबाच्या झाडावरील गुळवेलाला मोठी मागणी आहे.

या वेलीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तींनाच आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंब गुळवेलचा काढा सेवन करीत आहेत. काहीजण या वेलीचे छोटे-छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भिजत ठेवतात व ते पाणी सकाळी उपाशी पोटी सेवन करतात. तर काही कुटुंब या वेलीचे तुकडे पाण्यात टाकून ते पाणी उकळून काढा स्वरूपात पितात. गुळवेल हा एक रान भाजीचा प्रकार मानला जातो. या गुणकारी अमृतमय गुळवेल वनस्पतीची कोरोना काळात चांगलीच मागणी वाढली आहे. गुळवेलमुळे प्रतिकारशक्ती वाढते, दाब कमी होतो.

मलेरिया, टाइफाईड आजारावर फायदेशीर, पोटाच्या समस्या दूर होतात. मधुमेहावर गुणकारी, दम, खोकला व कफ कमी होतो. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे गुळवेल बहुगुणी वनस्पती मानली जाते. कोरोनाकाळात ही वनस्पती अमृत ठरत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात असून या वनस्पतीची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The nectar that melts on the corona great demand for plants in rural areas nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2021 | 12:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.