Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात काही तासांत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अस्लम शेख यांनी दिली माहिती

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2021 | 07:47 PM
राज्यात काही तासांत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अस्लम शेख यांनी दिली माहिती
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. याचं पार्शवभूमीवर राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अस्लम शेख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. “राज्यात आपण कठोर निर्बंध आणले. पण तरीही केसेस कमी होत नाहीयेत. ऑक्सिजनचा तुटवडा दिसत आहे. बेड मिळत नाहीत. आज बरीच चर्चा झाल्यानंतर येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल. आपण निर्बंध कठोर करत गेलो. ऑक्सिजनचा तुटवडा आणि वाढती रुग्णसंख्या पाहाता अखेर हा निर्णय घ्यावा लागला आहे. गाईडलाईन्स तयार करून तुम्हाला दिल्या जातील”, असं देखील अस्लम शेख यावेळी म्हणाले.

दरम्यान राज्यात सातत्याने वाढणारे करोना रुग्ण आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि बेड्सचा तुटवडा यावर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. यानंतर काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

लॉकडाऊन अत्यंत कडक असायला हवा अशी सगळ्यांचीच मागणी आहे. निर्बंध घालूनही रस्त्यावरून वाहनं फिरत आहेत. आम्ही सगळ्यांनीच मुख्यमंत्र्यांना तात्काळ कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून हे नियम लागू करतील. लॉकडाऊन हा काही आवडीचा विषय नाही. आज लोकांना बेड, ऑक्सिजन मिळत नाहीयेत. ऑक्सिजनच्या उत्पादनापेक्षा आपल्याला जास्त ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होऊन लोकांचा उपचार न मिळता मृत्यू होईल. म्हणून ही चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला कठोर लॉकडाऊन करायचा आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

[read_also content=”तातडीची गरज म्हणून आणखी तीन जम्बो कोविड रुग्णालय सुरु करा; सचिन साठे यांची मागणी https://www.navarashtra.com/latest-news/start-three-more-jumbo-covid-hospitals-as-a-matter-of-urgency-demand-of-sachin-sathe-nrdm-117902.html”]

मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार

दरम्यान, लॉकडाऊन नेमका कसा असेल, याविषयी सविस्तर माहिती अस्लम शेख किंवा एकनाथ शिंदे यांनी दिली नसली, तरी हा कठोर लॉकडाऊन असेल, असे सूतोवाच त्यांनी नक्कीच केले आहेत. दरम्यान, लोकांना प्रवासामध्ये फार अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं म्हणतानाच अस्लम शेख यांनी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याचेही संकेत दिले. यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री जनतेला माहिती देतील, अशी माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

Web Title: The state will announce a complete lockdown in a few hours information given by aslam sheikh after the cabinet meeting nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2021 | 07:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.