Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रॅफिक पोलिसांनी गाडी नेली उचलून, गाडीमालक पिस्तूल घेऊन थेट वाहतूक शाखेत अन् मग…

पोलिसांनी 'नो पार्किंग'मधील गाडी उचलल्यानंतर वाहनमालक थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरल्याची घटना साताऱ्यात घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पिस्तूल जप्त केली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 22, 2021 | 06:49 PM
ट्रॅफिक पोलिसांनी गाडी नेली उचलून, गाडीमालक पिस्तूल घेऊन थेट वाहतूक शाखेत अन् मग…
Follow Us
Follow Us:

सातारा : पोलिसांनी ‘नो पार्किंग’मधील (No Parking) गाडी उचलल्यानंतर वाहनमालक थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरल्याची घटना साताऱ्यात घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पिस्तूल जप्त केली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

गणेश हणमंत देवरे (वय २६, रा. गुरसाळे ता. खटाव, जि. सातारा) आणि विकास प्रल्हाद देवरे (वय २६, रा. दहिवडी, पोस्ट आंबवडे, ता. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यांवर जास्त वाहतूक होती. यावेळी ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीला अडचण येत असल्याने पोलीस ‘नो पार्किंग’मधील गाड्यांवर कारवाई करत होते. यावेळी अशीच ‘नो पार्किंग’मध्ये उभी असलेली गाडी (क्रमांक एमएच. ०३ बी. झेड. ५९९७) पोलिसांनी टोईंग करून वाहतूक शाखेत आणली. पोलिस हवालदार देवानंद बर्गे, अमर शंकर काशीद यांनी ही कारवाई केली.

त्यानंतर काही वेळाने या वाहनाचा मालक गाडी घेऊन जाण्यासाठी वाहतूक शाखेत आला. गाडी ‘नो पार्किंग’मध्ये नव्हतीच असे म्हणत तो पोलिसांसोबत हुज्जत घालत होता. यावेळी तो वारंवार खिशात हात घालत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याला घट्ट पकडून झडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला पिस्तूल सापडले. त्याची पाहणी केली असता त्यात एक जिवंत काडतूस आढळून आले. यामुळे वाहतूक शाखेत एकच खळबळ उडाली. देवानंद बर्गे, अमर शंकर काशीद या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने पिस्तूल घेऊन येणाऱ्यास पकडले.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नव्हता. या व्यक्तीच्या खिशात सापडलेली पिस्तूल परवान्याची असल्याचे समजत आहे. मात्र, दुसऱ्या व्यक्तीचा परवाना असलेली पिस्तूल या व्यक्तीकडे कशी सापडली याचा पोलीस शोध घेत आहेत. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Web Title: The traffic police picked up the vehicle and vehicle owner reached traffic branch with pistol nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2021 | 06:49 PM

Topics:  

  • No Parking

संबंधित बातम्या

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क
1

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.