मुंबई – बहुप्रतिक्षित झोंबिवली या मराठी चित्रपटाचा (Zombivli Trailer) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. थ्रिलर चित्रपटाला कॉमेडीचा तडका देण्यात आला असून प्रेक्षकांचा देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खूप दिवसानतंर आलेल्या या हॉरर थ्रिलर चित्रपटाला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. येत्या 26 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्यांदाच अमेय वाघ (Amey Wagh), असेल किंवा ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांचा हटके अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. झोंबीवर आधारित असलेला हा पहिला चित्रपट आहे. यात झोंबी बनलेले बरेच जण अमेय आणि ललितच्या मागावर आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. पोस्टर पाहूनच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.
[read_also content=”ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलमध्ये जय भीमची वर्णी! https://www.navarashtra.com/movies/jai-bhim-scene-features-in-oscars-you-tube-channel-224285.html”]
चित्रपटाची कथा झोंबी आणि त्यांपासून सुटका मिळविण्यासाठी चाललेली धडपड दाखविण्यात आली आहे. डोंबिवलीमध्ये कशाप्रकारे झोंबींची एंट्री होते आणि मग हळूहळू बऱ्याच थरारक गोष्टी कशाप्रकारे घडत जातात हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.