फोटो सौजन्य- official Website
उद्या 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. यानिमित्ताने ऑटोमोबाईल मार्केटमध्येही काही कंपन्यांकडून वाहनांचे लॉंचिग केले जाणार आहे. दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त टीव्हीएस (TVS) मोटर कंपनीने आपल्या सर्व-इलेक्ट्रिक स्कूटरची मर्यादित ‘सेलिब्रेशन एडिशन’ लॉन्च केले आहे – टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube) सेलिब्रेशन एडिशन iQube च्या 3.4 kWh आणि iQube S ट्रिमवर आधारित आहे. ही आवृत्ती काही मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे.
TVS iQube 3.4 kWh ‘सेलिब्रेशन एडिशन’ ₹ 1,19,628 (एक्स-शोरूम,) मध्ये उपलब्ध आहे आणि TVS iQube S ‘सेलिब्रेशन एडिशन’ ची किंमत ₹ 1,29,420 (एक्स-शोरूम)आहे. सेलिब्रेशन एडिशन व्हेरियंटसाठी बुकिंग उद्या 15 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार असून ही एडिशन 26 ऑगस्ट 2024 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या वाहनांचे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वितरण केले जाणार आहे.
TVS iQube चे सेलिब्रेशन एडिशन iQube 34 kWh आणि iQube S या तिच्या दोन्ही प्रकारांमध्ये प्रत्येकी फक्त 1,000 युनिट्सपर्यंत मर्यादित आहे. ग्राहकांना सेलिब्रेशन एडिशनमुळे ग्राहकांना मर्यादित एडिशन मिळणारच आहे तसेच ही एडिशन स्वातंत्र्यदिनाच्या कालावधीत असल्याने तीला खास महत्व प्राप्त होते. मर्यादित एडिशन iQube मध्ये ड्युअल टोन कलर स्कीम आहे, ठळक डिकल्स आणि स्पेशल बॅजिंग द्वारे पूरक, #CelebrationEdition असा हॅशटॅग ठळकपणे दिसून येते.TVS iQube सेलिब्रेशन एडिशनचे हे डिझाइन घटक स्कूटरला आकर्षक बनवतातच आणि ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय एक स्टाइलिश पर्याय देतात.
नवीन ज्यूपिटरची लवकरच होणार लॉंच
ज्यूपिटर 110 ही टीव्हीएस कंपनीची सर्वाधिक वकले जाणारे उत्पादन आहे. या TVS ज्युपिटर 110 चे नवे मॉडेल लवकरच TVS मोटर कंपनी केले जाणार आहे. या नव्या ज्युपिटर 110 मध्ये डिझाईन आणि प्लॅटफॉर्मच्या दृष्टीने मोठे फेरबदल असू शकतात. या ज्यूपिटरमध्ये ऍप्रनवर एप्रन-माउंट केलेले LED DRLs असू शकतात. TVS Jupiter ही गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रियतेमध्ये आणि ग्राहकांच्या पसंतीत आघाडीचे स्थान टिकवून आहे. त्यामुळे कंपनीकडून या वाहनामध्ये नवे मॉडेल लॉंच केले जात आहेत.