
crime (फोटो सौजन्य: social media)
Delhi Bomb Blast मधील कारचा संबंध पुलवामा हल्ल्याशी? त्या कार कुठून आल्या
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याने पतीने तिच्या प्रियकराला संपवण्यासाठी खंडणी दिली आणि गोळीबार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे. राजेश सिंगची हत्या झाली होती. याच प्रकरणाच्या तपास दरम्यान आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या मऊ येथे राजेश सिंग नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. राजेश सिंग याचे राजेश यादवच्या पत्नीशी अवैध संबंध होते. याच अवैध संबंधामुळे राजेश यादवने आपल्या पत्नीला सोडून दिले होते. यामुळे राजेश यादव विरुद्ध द्वेष पसरला होता. राजेश यादवने खंडणी देऊन राजेश सिंगची हत्या केली आहे. संबंधित प्रकरण लक्षात घेणं गरजेचं आहे. 26 ऑक्टोबर रोजी मारेकऱ्यांनी राजेश सिंगवर गोळीबार करत हत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली.
कशी केली अटक ?
दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की, मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या असलपूरजवळ दोन गुन्हेगार दुचाकीवरून जात होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांवर घेराव घातला. या गोळीबारात एका गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागली आणि त्यांना पोलिसांनी पकडले. त्यानंतर, पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
गुन्हा कबूल
या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान, दोन्ही गुन्हेगारांनी उघड केलं की, राजेश सिंगचे राजेश यादवच्या पत्नीशी अवैध संबंध सुरु होते. त्यानंतर राजेश यादवने खंडणी देऊन राजेश सिंगची हत्या केली.
Ans: मऊ
Ans: राजेश सिंग
Ans: राजेश यादव