सांगली: सांगलीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका घोड्याच्या तबेल्यात शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मित्रांनी रात्री पार्टी केली आणि त्यात शिवीगाळ झाली. याच शिवीगाळवरून वाद वाढला आणि हत्या झाली.
Uttarpradesh: पतीचा चकित करणारा निर्णय! पत्नीचे तिच्या प्रियकराशी लावून देणार लग्न एवढेच नाही तर…
नेमकं काय घडलं?
मृतक अमीर कन्नुरे हा गेल्या पाच- सहा वर्षांपासून कुरणे यांच्या तबेल्यात झोपायला असायचा. तेथील किरकोळ कामे करत होता. अमीर याला दारूचे व्यसन होते. संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते. तिघांना दारूचे व्यसन त्यामुळे हे तिघे नेहमीच एकत्र दारू प्यायला बसायचे. अमीर आणि संशयित
मलिक, निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते. तेव्हा अमीर याने मित्रांना अश्लील शिवीगाळ केली होती. त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता. याच रागाच्या भरातून दोघांनी आमिरचा काटा काढायचे ठरवले.
रात्री आकाराच्या सुमारास अमीर तबेलेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला.तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा त्याच्या मित्रांसोबत तबेल्याच्या बाहेर गप्पा मारत बसला होता. काहीवेळाने मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला. काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफीससमोरील बोळात तो गेला.
त्यावेळी हे दोघेजण आमिरचा काटा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते. नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचे पाहून दोघेजण आतमध्ये आले. अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता. त्यांनी आत आल्यांनतर आमिरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्याराने वार केले. तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परतत होता. तेव्हा त्याला दोघेजण पळून जातांना दिसले. त्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला. नितीन पळत तबेल्यात आला. तेव्हा अमिरवर हल्ला झाल्याचे दिसून आले.त्याने तात्काळ कुरणे यांना कळवले. जखमी अमीर याला तत्काळ सिव्हील रुग्णालयात हलवले. परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतांनाच त्याने जीव सोडला.
पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केले असून आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी पोलीस करत आहे. हा सगळा प्रकार जमील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेल्यात मध्यरात्री घडला आहे.






