
crime (फोटो सौजन्य: social media)
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. खुशबू अहिरवार असं या महिलेचे नाव असल्याचे सांगितलं जात आहे. हे प्रकरण लव्ह-जिहादचे असल्याचे समजले जात आहे. हा प्रकार इंदौर रोड येथील भैंसाखेडी येथील आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह रुग्णालयातून ताब्यात घेतले आहे. खुशबू अहिरवार यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मुस्लिम बॉयफ्रेंड कासिम खुशबूला रुग्णालयात सोडून फरार झाला.
Delhi Bomb Blast मधील कारचा संबंध पुलवामा हल्ल्याशी? त्या कार कुठून आल्या
१२ हजार फॉलोवर्स
खुशबू अहिरवार सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती डायमंड गर्ल या नावाने अकाऊंट चालवत होती. तिचे जवळपास १२ हजार फॉलोवर्स होते. तिला खुशी वर्माच्या नावानेही ओळखलं जायचं.तिने बीए फर्स्ट ईअरनंतर शिक्षण सोडलं होतं. मागील तीन वर्षांपासून ती भोपाळमध्ये राहत होती. तिने अनेक लोकल बँड्ससाठी मॉडलिंग केली होती. तसेच ती पार्ट टाईम जॉब करून तिचा खर्च भागवायची .खुशबू कासिमसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
खुशबूच्या आईने काय म्हंटल?
खुशबूची आई लक्ष्मी अहिरवारने म्हटलं की, ती नेहमी सांगायची की, मला खूप मोठं करिअर करायचं आहे. तीन दिवासंपूर्वी कासिमने तिला फोन केला होता. त्याने म्हटलं होतं की, तो मुस्लिम आहे. पण तुमची मुलगी माझ्या सोबत आहे. तुम्ही काळजी करू नका. मी त्याला सोबत घेऊन उज्जेनला जात आहे. मुलीने फोनवर म्हटलं की, तुम्ही काळजी करू नका. कासिम चांगला मुलगा आहे. मी त्याच्यासोबत आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, कासिमचं खुशबूसोबत अफेअर होतं. त्यानेच तिचा खून केला आहे. खुशबूच्या प्रायव्हेट पार्ट,खांदा आणि चेहऱ्यावर जखमांचे निशाण आढळल्याचा आरोप देखील तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कासीम आधीपासून गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी
पोलिसांनी खुशबूचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. तर पोस्टमार्टम गांधी मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे. आरोपी कासीम उज्जेन येथील रहिवासी आहे. लिसांनी कासिमचा शोध सुरु केला आहे. आरोपी कासीम अहमद आधीपासून गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी आहे. बेकायद दारुच्या व्यवहारात आधीच तो तुरुंगात जाऊन आलाय. कासिम खुशबूच्या मोबाइलवरुन ऑनलाइन व्यवहार करायचा. त्यांच्यात पैशांवरुन काही वाद होते. चौकशी दरम्यान पोलिसांना संशयास्पद व्यवहाराचे काही पुरावे मिळाले आहेत. त्याचा तपास सुरु आहे.
Kamshet Ghat Accident: कामशेत घाटात भीषण अपघात! कार्तिकी वारीत कंटेनर घुसला; एक वारकरी ठार
Ans: भोपाळ
Ans: कासिम
Ans: डायमंड गर्ल