उत्तराखंड निवडणूक निकाल २०२२: उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. वृत्त लिहेपर्यंत भारतीय जनता पक्ष ३६, काँग्रेस २६ जागांवर पुढे आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये १० जागांचा फरक आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता राज्यातील ७० विधानसभा जागांवर मतमोजणी सुरू झाली.