उत्तराखंड : उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ साठी आज (गुरुवार) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. येथे जाणून घ्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे क्षणोक्षणी अपडेट्स.
उत्तराखंडमध्ये बहुमत मिळाल्याने भाजप नेते आनंदी असून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. उत्तराखंडमध्ये भाजप ४१, काँग्रेस १९ आणि अपक्ष उमेदवार ५ जागांवर आघाडीवर आहेत.
काँग्रेस नेते हरीश रावत म्हणाले की, आम्ही बहुतांश जागा जिंकत आहोत आणि जिथे आम्ही पिछाडीवर आहोत, तिथे निकराची लढत आहे. तासाभरात ही आघाडी उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या बहुमतात बदलेल आणि पंजाबमध्येही बहुमत मिळेल.