Valantine Week Started Rose Day 2024 History And Significance Nrps
‘या’ दिवशी जोडपे एकमेकांना लाल गुलाब का देतात, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास…
महाराणी व्हिक्टोरियाच्या होत्या त्या वेळी लोकं आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाबांच फुलं देत होते. याचं परंपरेचं पालन करण्यासाठी हा रोझ डे सेलिब्रेट केला जातो.
व्हॅलेंटाईन वीक (Valantine Week) सुरु झाला आहे आणि आज ७ फेब्रुवारी आहे, त्याचा पहिला दिवस रोज डे आहे. जगभरातील लोक हा दिवस रोज डे (Rose Day ) म्हणून सेलिब्रेट करतात, ज्यामध्ये प्रत्येक जोडपे एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का, रोझ डे का साजरा केला जातो? त्याचा इतिहास. रोझ डे साजर करण्यामागे काय कारण आहे, हे जाणून घेऊया.
[read_also content=”फायटरमधील हृतिक-दीपिकाच्या किसींग सिनवरुन नवं वादळ, हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं घेतला आक्षेप; पाठवली कायदेशीर नोटीस! https://www.navarashtra.com/movies/air-force-office-send-legal-notice-to-fighter-movie-team-over-hrithik-roshan-deepika-padukone-kissing-scene-nrps-505139.html”]
कधी साजरा केला जातो रोझ डे
व्हॅलेंटाईन वीक सुरु झाल्यावर सर्वात आधी येतो तो रोझ डे. रोझ डे 7 फेब्रुवारीला सेलेब्रेट करण्यात येतो. या दिवशी कपल्स आपल्या पार्टनरला गुलाबाचं फुल देऊ आपल्या भावना व्यक्त करतो.
का साजरा करता रोझ डे
गुलाबाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. लोकं एकमेकांना प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी गुलाबाचं फुलं देतात. रोज डे च्या दिवशी अशा व्यक्तींना गुलाबाचं फुलं देतो जे आपल्याला आवडतात किंवा ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे.
रोझ डे चा इतिहास
असं म्हणतात की, मुघल शासक जहांगीरची पत्नी नूरजहाँला गुलाब फार आवडत होते. जहांगीर यांना आंनदी करण्यासाठी ती रोज एक टन गुलाबाची फुलं त्यांच्या महालात पाठवत होती. त्यांची ही प्रेमकहाणी लोकांमध्ये खूप प्रसिध्द झाली होती. तसचं रोझ डे बद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते. महाराणी व्हिक्टोरियाच्या होत्या त्या वेळी लोकं आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाबांच फुलं देत होते. याचं परंपरेचं पालन करण्यासाठी हा रोझ डे सेलिब्रेट केला जातो.
Web Title: Valantine week started rose day 2024 history and significance nrps