SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांसाठी 'अमृत वर्षी' ही ४४४ दिवसांची विशेष एफडी योजना आणली आहे. या योजनेत सामान्य नागरिकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच नियमित एफडीपेक्षा जास्त व्याजदर मिळत आहे. या फोटोस्टोरीमध्ये जाणून घ्या.( सौजन्य - सोशल मीडिया )

SBI ची 'अमृत वर्षी' योजना: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४४४ दिवसांच्या FD योजनेअंतर्गत ग्राहकांना चांगला परतावा मिळत आहे.

या योजनेमध्ये सामान्य नागरिकांना ६.४५%, ज्येष्ठ नागरिकांना ६.९५% आणि ८० वर्षांवरील अति ज्येष्ठ नागरिकांना ७.०५% वार्षिक व्याजदर दिला जात आहे.

५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सर्वसामान्य नागरिकांना ४०,१५० रुपये तर ज्येष्ठ नागरिकांना ४३,३८० रुपयांपर्यंतचा निव्वळ व्याजाचा फायदा मिळतो.

१० लाख रुपयांच्या ठेवीवर सामान्य नागरिकांना ८०,३०० रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ८६,७६० रुपयांचा भरीव नफा मिळतो.

शेअर बाजारातील धोके टाळून निश्चित आणि खात्रीशीर परतावा मिळवण्यासाठी ही विशेष एफडी योजना अतिशय उपयुक्त आहे.






