Jalgaon E-Bus Service: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
जळगाव (वा.) शहरातील नागरिकांना वाहतूक सेवेच्या सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी केंद्र शासनाच्या शंभर टक्के निधीतून पी.एम.ई. बससेवा महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्याच अंतर्गत जळगावात ही सेवा दिवाळीनंतर सुरू होणार आहे. महापालिकेने आगार उभारणीसह सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. राज्यात सर्व महापालिका क्षेत्रांत केंद्राच्या पी.एम.ई. बसेस सुरू होत आहेत. सोलापूर, ठाणे, पुणे येथे ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आता जळगाव, अहिल्यानगर, कोल्हापूर, मालेगाव येथे ही सेवा सुरू होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे, मात्र महापालिकेवर त्याचा कोणताही भार पडणार नाही. Jalgaon E-Bus Service:
जळगाव महापालिकेतर्फे मेहरूण शिवारातील जुन्या टी. बी. हॉस्पिटलच्या दोन एकर जागेत ई-बससेवेचा हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ठिकाणी आगार उभारणीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आलेले आहे.
अग्निशमन केंद्रांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली आहे. स्थायी समिती सभेने त्याला नुकतीच मंजुरी दिलेली असून, त्याचेही काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महापालिकेने आगार उभारणीचे काम पूर्ण केलेले आहे. तसेच बसेसचे मार्ग, थांबे याबाबतही आखणी करण्यात आली आहे. तर चालक व वाहक भरण्यासाठी निविदा काढून कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे. आता केवळ केंद्रीय पाहणी पथकाची प्रतीक्षा आहे, त्यांनी पाहणी केल्यानंतर ते हिरवा कंदील देतील. दिवाळीनंतर या बसेस जळगावच्या रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.
Machal Village: मिनी महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदाच एसटी धावली! ७८ वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण
जळगाव शहरासाठी ५० ई-बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्यात २४ मोठ्या, सहा मध्यम व २० मिनी बसेस असणार आहेत. या सर्व बसेस वातानुकूलित असणार आहेत. या बसेस लवकरच जळगावला प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Jalgaon News: ना बंगला, ना झगमगाट… पालकमंत्र्यांनी साजरी केली …
अग्निशमन केंद्रांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली आहे. स्थायी समिती सभेने त्याला नुकतीच मंजुरी दिलेली असून, त्याचेही काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महापालिकेने आगार उभारणीचे काम पूर्ण केलेले आहे. तसेच बसेसचे मार्ग, थांचे याबाबतही आखणी करण्यात आली आहे, तर चालक व वाहक भरण्यासाठी निविदा काढून कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे. आता केवळ केंद्रीय पाहणी पथकाची प्रतीक्षा आहे. त्यांनी पाहणी केल्यानंतर ते हिरवा कंदील देतील. दिवाळीनंतर या बसेस जळगावच्या रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.
Ans: दिवाळीनंतर जळगाव शहरात पीएम ई-बससेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Ans: जळगाव शहरासाठी एकूण ५० ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.
Ans: यामध्ये २४ मोठ्या, ६ मध्यम आणि २० मिनी बसेस असणार आहेत.






