जळगाव : चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी अनेक वेळी तारखा त्यांनी जाहीर केल्या. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले असून सत्तेत नसल्याने त्यांना वन वन फिरावे लागत आहे त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी केली आहे.
बहुमत पेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडी कडे आहे सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे. सरकार पडायला ठोस कारण असला पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे तोपर्यंत हे सरकार करू शकत नाही अशी प्रतिक्रिया आणि एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
[read_also content=”उत्साह तर खूप होता पण खिशात होते फक्त 100 रुपये…व्हॅलेंटाइन डे निमित्त सिध्दार्थ चांदेकरनं शेयर केली गमतीशीर आठवण https://www.navarashtra.com/lifestyle/exclusive-interview-with-actor-siddhart-chandekar-on-valantine-day-nrps-237706.html”]
वाईन बाबत एक विरोध करतोय तर दुसरे स्वागत करत आहे . वाईन ही दारू आहे त्यामुळे अण्णा हजारे यांनी यासाठी विरोध केला आहे. मध्यप्रदेश मध्ये मॉलमध्ये बियर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली आंध्रप्रदेश मध्ये भाजपला निवडून दिलं तर दारूही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य येथील प्रदेश अध्यक्षांनी केले आहे . त्यामुळे वाइन बाबत भाजपची दुटप्पी भूमिका का ? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
[read_also content=”‘ती होच म्हणणार’ याची खात्री होती’… शिवानी-विराजसची कॉन्फिडन्ट लव्हस्टोरी https://www.navarashtra.com/latest-news/virajas-kulkarni-exclusive-interview-on-valantine-day-nrps-237198.html”]
मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे याबाबत प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी बच्चू कडू हे वरच्या न्यायालयात दाद मागणार असून वरच्या न्यायालयात काय निर्णय लागतो याची वाट पाहिली पाहिजे अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांची एकनाथ खडसे यांनी पाठराखण केली आहे.
भुसावळ येथे अनिकेत पाटील मित्रमंडळ व अफ्फन क्रिकेट क्लबतर्फे आयोजीत स्व. निखीलभाऊ खडसे स्मृती चषक-२०२२ या स्पर्धेच्या पारितोषीक वितरणाच्या कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री श्रावणी गोस्वामी खासदार रक्षा खडसे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आधी मान्यवर उपस्थित होते