
प्रभाग 10 मधील निवडणूक प्रचाराने आता वेग घेतला असून, सरस्वती काथारा यांना मतदारांकडून मिळणारा पाठिंबा पाहता त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मोठे वळण आले आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवार सरस्वती काथारा यांच्या रॅली आणि पदयात्रांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी जाऊन संवाद साधण्यावर भर देणाऱ्या काथारा यांनी मतदारांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले असून, त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.
महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना आहे. पाणी, रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी मांडलेली भूमिका मतदारांना भावत आहे. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत औक्षण करून आणि पुष्पहार घालून केले जात आहे.”लोकांचा हा उत्साह पाहून मला अधिक काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. प्रभाग 10 च्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. असं सरस्वती काथारा यांनी पनवेलकारांना आश्वासन दिलं आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सरस्वती काथारा यांनी गेल्या काही दिवसांत प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. विरोधकांच्या तुलनेत त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने “आता फक्त मतदानाची औपचारिकता उरली आहे,” अशी चर्चा प्रभागात रंगली आहे. येत्या निवडणुकीत आता कोणाचं पारडं जड होतंय हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.