Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाकिब अल हसन जाणार तुरुंगात; बांगलादेशच्या क्रिकेटर्सचे करिअर धोक्यात; जाणून घ्या नेमकं प्रकरण

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर मोठा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तो सध्या पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 27, 2024 | 07:20 PM
Shakib Al Hasan Murder Allegation Case Details

Shakib Al Hasan Murder Allegation Case Details

Follow Us
Follow Us:

Shakib Al Hasan Murder Allegation Case Details : बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन सध्या मोठा गंभीर आरोप झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तो पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला आहे त्यात बांगलादेशने बाजी मारली. या सामन्यादरम्यान शाकिब अल हसनवर खुनाचा आरोप असल्याची बातमी समोर आली होती. ही बातमी येताच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. मग शाकिबवर कोणाच्या हत्येचा आरोप होता? यामुळे शाकिबची कारकीर्द संपुष्टात येईल का? काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या सविस्तर

ढाक्याच्या एदाबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार

शाकिब अल हसनसोबत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही हत्येचा आरोप आहे. रफीकुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने या खुनाचा गुन्हा दाखल केला होता, ज्याचा 17 वर्षीय मुलगा रुबेल बांगलादेशातील निषेधादरम्यान गोळ्या घालून ठार झाला होता. ढाक्याच्या एदाबर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती, ज्यामध्ये 154 लोकांची नावे आहेत आणि शाकिबला 28 वा आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रफिकुल इस्लामच्या वकिलांनी शकीबला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून काढून टाकण्याची मागणी केली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये शाकिबवर क्रिकेटमधून बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिले स्पष्टीकरण

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी शाकिबच्या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले होते की, “पहा, एफआयआर ही फक्त पहिली माहिती आहे आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी अद्याप कोणतेही आरोप केलेले नाहीत. त्यामुळे आता कोणताही निर्णय घेणे कठीण आहे. दुसरी कसोटी 30 ऑगस्टपासून आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी आपण याबाबत काय करावे याचा विचार करू शकतो.

शाकिब अल हसन बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारमध्ये मंत्री होते. बांगलादेशातील हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडून पळ काढला. यानंतर शाकिबलाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

शाकिब अल हसनची कारकीर्द संपणार?
सध्या शाकिबवर केवळ आरोपच केले जात आहेत, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीबाबत काहीही सांगता येणार नाही. जर त्याच्यावरील आरोप खरे सिद्ध झाले आणि त्याला शिक्षा झाली तर अशा परिस्थितीत त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. मात्र, या खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Will shakib al hasan go to jail the bangladeshi stars career will end now know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • ICC
  • shakib al hasan

संबंधित बातम्या

ICC ODI Worldcup : 2027 वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर, जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा
1

ICC ODI Worldcup : 2027 वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर, जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
2

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
3

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…
4

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.