
Jay Shah re-elected as ICC chairman
ऑगस्ट २०२६ मध्ये जय शाह यांची दोन वर्षांसाठी आयसीसीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. शाह यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाला. आता, दोन वर्षांनंतर, त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. शाह यांची आणखी दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते डिसेंबर २०२८ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे नेतृत्व करतील. म्हणजेच. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील क्रिकेट स्पर्धा त्यांच्या कार्यकाळातच आयोजित केल्या जातील.
पुन्हा अध्यक्ष झाल्याबद्दल जय शाह म्हणाले की, ‘आयसीसी बोर्डाने माझ्यावर दाखवलेल्या सातत्यपूर्ण विश्वासाने मी अत्यंत भारावून गेलो आहे. ज्या प्रत्येक संचालकाने सातत्याने विश्वास आणि पाठिंबा दर्शवला आहे, त्या सर्वांचा मी आभारी आहे. आयसीसी अध्यक्ष म्हणून काम करणे हा एक सन्मान आणि जबाबदारी दोन्ही आहे. जगभरात क्रिकेटचा विकास करण्यासाठी मी आमच्या सदस्यांसोबत काम करण्यावर लक्ष केंद्रित करेन.’
शाह पुढे म्हणाले, ‘आपण क्रीडा इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या आणि रोमांचक काळात प्रवेश करणार आहोत. LA28 च्या माध्यमातून क्रिकेट ऑलिम्पिक खेळांमध्ये पुनरागमन करत आहे. हा खेळ नव्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याची आणि भावी पिढ्यांना प्रोत्साहन देण्याची ही एक उत्तम संधी आहे. आपल्याला एक मजबूत आणि उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे. माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की, लोकांना एकत्र आणण्याची क्षमता हीच क्रिकेटची सर्वात मोठी ताकद आहे.’
जय शाह यांना आयसीसीच्या सर्व सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळाला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन, आयसीसीचे उपाध्यक्ष आणि झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष त्सावांग्वा मुकुहलानी यांनी जय शाह यांच्या कामाची प्रशंसा केली. न्यूझीलंड क्रिकेटचे संचालक रॉजर तावूस, आयसीसी सहयोगी सदस्य अध्यक्ष गुरुमूर्ती पलानी आणि आयसीसीचे स्वतंत्र संचालक रॉस रिवाझ यांनीही आपला पाठिंबा दिला.
Ans: जय शाह यांची ICC बोर्डाच्या बैठकीत सलग दुसऱ्यांदा चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
Ans: जय शाह यांची ICC चेअरमनपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये ते पहिल्यांदा या पदावर विराजमान झाले होते.
Ans: जय शाह यांचा दुसरा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.