बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला, गुलामगिरी पत्करावी लागली. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले? बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित ‘बलोच’ या चित्रपटाच्या ट्रेलर (Baloch Trailer ) लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भव्य रांगोळी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात, मराठमोळ्या, राजेशाही थाटात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
[read_also content=”तक्रार मागे घेण्यासाठी कुस्तीपटुंना दिलं जातय ‘पैशाच्या पैशाचं’, बजरंग पुनियाचा मोठा आरोप, म्हणाला त्यांना काही झालं तर… https://www.navarashtra.com/india/wrestlers-are-being-given-money-to-withdraw-complaints-bajrang-punias-big-allegation-said-if-anything-happens-to-them-nrps-391409.html”]
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर या चित्रपटातील ‘खुळ्या जिवाला आस खुळी’ हे पहिलं प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता चित्रपटाच्या ट्रेलरमधुन बलुचिस्तानचे रोमांचकारी युद्ध अनुभवायला मिळणार आहे. ‘बलोच’चा टिझर अंगावर शहारे आणणारा आहे. चित्रपटातील दमदार संवाद मनाला भिडणारे आहेत. एका मराठी लढवय्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही कहाणी आहे. गुलामगिरी पत्करूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांचा हा विजय म्हणजे ‘बलोच’. चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाची भव्यता कळतेय.
चित्रपटाविषयी दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणाले की, “पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या पदरी घोर निराशा पडली. कधी हार न स्वीकारणारे मराठे गुलामगिरीला मुकले. परक्यांचा अन्याय, अत्याचार सहन करत प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता समर्पण देणाऱ्या हरहुन्नरी वीरांची शौर्यगाथा ‘बलोच’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही पराभवाची कहाणी नसून मराठ्यांच्या विजयगाथेची कहाणीआहे. अतिशय शानदार पद्धतीने या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, खूपच आनंद आहे या गोष्टीचा. प्रत्येक कलाकार उत्कृष्ट आहे आणि त्यांचा दमदार अभिनय पडद्यावर दिसेलच. या चित्रपटातील लढवय्या मराठ्यासाठी प्रवीण तरडे यांच्या शिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही.”