Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेंचेस घोटाळ्यातील ठेकेदार नितेश राणेंच्या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप

आरक्षण बचाव रॅलीमध्ये देश स्तरावर बोलणाऱ्या नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात समाज कल्याण विभागामध्ये करण्यात आलेला बेंचेस घोटाळा या बाबत बोलणे टाळले. त्यांच्याच पक्षातील बॅंचेस घोटाळ्या प्रकरणातील काही ठेकेदार आरक्षण बचाव रॅलीत सहभागी झालेले दिसले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2024 | 04:57 PM
बेंचेस घोटाळ्यातील ठेकेदार नितेश राणेंच्या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप

बेंचेस घोटाळ्यातील ठेकेदार नितेश राणेंच्या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

भगवान लोके, कणकवली : आरक्षणाच्या मुद्द्यावर मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करणारे आमदार नितेश राणे हे याच मागासवर्गीय समाजाचा हक्काचा निधी असलेला समाज कल्याण विभागांमध्ये केलेल्या बॅंचेस घोटाळ्याच्या विषयावर गप्प का?आरक्षण बचाव रॅलीमध्ये नितेश राणेंनी बॅंचेस घोटाळ्या प्रकरणावर भाष्य का केले नाही ? एकिकडे आरक्षित समाजाच्या बाजूने गळे काढायचे आणि दुसरीकडे मात्र त्याच मागासवर्गीय समाजाला मिळणाऱ्या सुविधांमध्ये योजनेमध्ये भ्रष्टाचार करायचा व प्रकरण अंगाशी आल्यावर मूग गिळून गप्प बसायचं ही आमदार नितेश राणे ही भूमिका असल्याचा घणाघाती आरोप युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. बेंचेस घोटाळ्यातील काही ठेकेदार आमदार राणेंच्या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी होते असल्याचा आरोप त्यांनी केला.

आरक्षण बचाव रॅलीमध्ये देश स्तरावर बोलणाऱ्या नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात समाज कल्याण विभागामध्ये करण्यात आलेला बेंचेस घोटाळा या बाबत बोलणे टाळले. त्यांच्याच पक्षातील बॅंचेस घोटाळ्या प्रकरणातील काही ठेकेदार आरक्षण बचाव रॅलीत सहभागी झालेले दिसले. त्यामुळे बेंचेस घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराच्या पैश्यातून ही रॅली काढण्यात आली आहे काय ? ते सुद्धा आमदार नितेश राणेंनी जाहीर करणे गरजेचे होते. नितेश राणेंनी काढलेली आरक्षण रॅली ही महायुती म्हणून घोषित करण्यात आली होती. पण आज प्रत्यक्षात महायुतीतील कोणताही घटक पक्ष या रॅलीत सहभागी झालेला दिसला नाही. खरं तर नितेश राणे हे महायुतीतील घटक पक्षांना किंमतच देत नाही. यामुळे सद्यस्थितीत महायुतीतील घटक पक्ष नितेश राणेसोबत नाहीत ,असा टोला सुशांत नाईक यांनी लगावला.

नितेश राणे सतत मुस्लिम बांधवांवर करत असलेली व्यक्तव्य ही महायुतीतील घटक पक्षांना मान्य आहेत काय ? त्याबरोबरच आरक्षण बचाव रॅलीत व व्यासपीठाच्या आजूबाजूला बॅंचेस घोटाळा प्रकरणातील ठेकेदार दिसत होते. ज्यांना या घोटाळ्यातून पैसे मिळाले त्यांनाच या रॅलीसाठी माणसे आणण्याची जबाबदारी दिल्याची ही मागासवर्गीय समाजामध्ये चर्चा आहे. व याच ठेकेदारंकडून भ्रष्टाचाराच्या पैशातून ही रॅली काढण्यात आली अशी चर्चा जनतेमध्ये आहे. ही रॅली जाणवली पुलापासून जी काढण्यात आली त्यात वस्तुस्थिती बघता कणकवली मतदार संघातील जनता सहभागी झाली नाही.

ठेकेदार व राणेंच्या जवळचे कार्यकर्ते असलेल्यांची ही रॅली झाली या उलट बॅंचेस घोटाळा प्रकरणाच्या विरोधात मागासवर्गीय समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी काढलेल्या रॅलीत सुमारे १ हजार पेक्षा जास्त मागासवर्गीय समाज बांधव व महिला सहभागी झाल्याचे दिसून आले.बेंचेस घोटाळ्याचा मागासवर्गीय समाज बांधवानी एकत्रित येऊन आपल्या हक्काच्या निधी साठी आवाज उठविला ते नितेश राणे यांच्या साठी चपराक होती.याचा अर्थ नितेश राणेंच्या पाठीशी मागासवर्गीय समाज नाही आहे हे स्पष्ट दिसून आले.

त्यामुळे त्यांना मतदारसंघ बाहेरील माणसे आयात करावी लागली. आमदार नितेश राणे यांनी अश्या दुटप्पी भुमिका घेऊन जनतेची करत असलेली दिशाभूल आता थांबवावी. नितेश राणे करत असलेली दिशाभूल ही कणकवलीच्या जनतेला चांगलीच समजून आली आहे व याचे प्रतिउत्तर म्हणून येणाऱ्या विधानसभेला नितेश राणे यांचा पराभव हा निश्चित आहे,असेही सुशांत नाईक यांनी म्हटले आहे. नितेश राणे हे निव्वळ ठेकेदारी पोसण्यासाठीच काम करतात, हे सुद्धा या समाजाला दिसून आले आहे. कार्यकर्त्यांना धमक्या देऊन आता तुम्ही कुणाचा आवाज दाबू शकत नाही, हे सुद्धा आमदार राणे यांनी लक्षात ठेवावे,असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला.

Web Title: Yuva sena district chief sushant naik alleges he participated in nitesh rane aarakshan bachao rally in benches scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 04:57 PM

Topics:  

  • kankavali
  • Nitesh Rane
  • Sushant Naik

संबंधित बातम्या

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
1

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश
2

Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून याला राहुल गांधी म्हणतात – नितेश राणे
3

स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून याला राहुल गांधी म्हणतात – नितेश राणे

CM Fadnavis on Malegaon blast :दहशतवाद भगवा कधीच नव्हता…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया
4

CM Fadnavis on Malegaon blast :दहशतवाद भगवा कधीच नव्हता…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.