वॉटर फास्ट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
How to Lose Weight Fast: अलीकडे, कोस्टा रिकाचा रहिवासी एडिस मिलर याचे वजन कमी करण्याचे रहस्य व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला असून फक्त 21 दिवसात केवळ पाणी पिऊन 13 किलो वजन कमी केल्याचा दावा त्याने केला आहे. याला वॉटर फास्टिंग असेही म्हटले जात आहे, जे जलद वजन कमी करण्यात खूप उपयुक्त ठरू शकते.
पण वजन कमी करण्याची ही पद्धत तुमच्यासाठी सुरक्षित आहे का? असाही प्रश्न या निमित्ताने आता विचारला जातोय. पण त्याआधी वॉटर फास्टिंग म्हणजे काय आणि ते करणं योग्य आहे की नाही हे आपण जाणून घ्यायला हवे. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
वॉटर फास्टिंग म्हणजे काय?
वॉटर फास्ट म्हणजे काय (फोटो सौजन्य – iStock)
वॉटर फास्टिंग म्हणजे ठराविक कालावधीसाठी फक्त पाणी पिणे. हा कालावधी 24 तासांपासून अनेक आठवड्यांपर्यंत असू शकतो. एडिस मिलरच्या बाबतीत हा कालावधी 21 दिवसांचा होता. वॉटर फास्टिंगचे समर्थक असा दावा करतात की वॉटर फास्टिंग हे शरीराला डिटॉक्स करते, पचन सुधारण्यास मदत करते आणि मानसिक स्थिती यामुळे सुधारते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासातदेखील सांगण्यात आले आहे की, वजन कमी करण्यात आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी वॉटर फास्टिंगचा उपयोग होतो.
वॉटर फास्टिंग सुरक्षित आहे का?
केवळ पाणी पिऊन वजन कमी करणे योग्य की अयोग्य (फोटो सौजन्य – iStock)
आम्ही या विषयावर आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांचा सल्ला घेतला. तज्ज्ञांच्या मते, वैद्यकीय सल्ल्याशिवाय फक्त पाणी करणे धोकादायक ठरू शकते. वॉटर फास्टिंगमध्ये शरीरात पौष्टिकतेची कमतरता भासू शकते. ज्यामुळे अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ वॉटर फास्टिंग आणि सतत असे केल्याने स्नायूंचे नुकसान, हाडे कमकुवत होणे, हृदय समस्या उद्भवून मृत्यूदेखील होऊ शकतो.
कोणते लोक वॉटर फास्ट करू शकत नाहीत?
गरोदर स्त्रिया, स्तनदा महिला, मधुमेहाचे रुग्ण, खाण्यापिण्याच्या विकाराने त्रस्त असलेले आणि कमी वजनाच्या व्यक्तींनी वॉटर फास्ट टाळावा. हे तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते आणि इतरही व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा उपयोग करू नये.
वजन कमी करण्याची ही पद्धत सुरक्षित आहे का?
वॉटर फास्ट सुरक्षित आहे का? (फोटो सौजन्य – iStock)
वजन कमी करायचे असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते तुमच्यासाठी संतुलित आहार योजना तयार करू शकतात, ज्यामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश आहे. नियमित व्यायामामुळेही वजन कमी होण्यास मदत होते. वॉटर फास्टिंग वजन कमी करण्याचा एक मार्ग असू शकतो, परंतु ते प्रत्येकासाठी सुरक्षित नाही आणि अनेक आरोग्य धोके आहेत. वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर संतुलित आहार आणि व्यायाम करणे हाच आहे.
एडिस मिलरची पोस्ट
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.