Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी ‘मखाना स्मूदी’

Makhana Smoothie Recipe : ही पौष्टिक मखाना स्मूदी चव आणि आरोग्य यांचा सुंदर मेळ साधणारी असून, वजन कमी करण्यासाठी आहारात हिचा समावेश खूप फायद्याचा ठरतो. चला घरच्या घरी मखाना स्मूदी कशी बनवायची ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 17, 2026 | 09:35 AM
Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी 'मखाना स्मूदी'

Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी 'मखाना स्मूदी'

Follow Us
Follow Us:
  • मखाना हा हा कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.
  • वजन कमी करण्यासाठी याचे सेवन खूप फायद्याचे ठरते.
  • अनेकांना ठाऊक नाही पण तुम्ही मखान्यांची क्रिमी स्मूदी घरच्या घरी तयार करू शकता.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीराला आवश्यक पोषण देणारे, पटकन तयार होणारे आणि चविष्ट असे पदार्थ निवडणे गरजेचे झाले आहे. अशाच आरोग्यदायी पर्यायांपैकी एक म्हणजे मखाना स्मूदी. मखाना हा हलका, पचायला सोपा आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा घटक आहे. उपवासात किंवा रोजच्या आहारातही तो सहजपणे समाविष्ट करता येतो. फळे, ड्रायफ्रूट्स आणि दुधासोबत मखान्याची जोड दिल्यास तयार होणारी ही स्मूदी केवळ चवदारच नाही तर शरीराला ऊर्जा देणारी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, व्यायामानंतर किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

साहित्य

  • १ कप मखाना
  • २ चमचे शेंगदाणे
  • १ सफरचंद
  • १ केळी
  • १ खजूर
  • १ ग्लास दूध
  • १ चमचा भिजवलेले चिया सीड्स
  • बदाम आणि काजूचे तुकडे
कृती
  • सर्वप्रथम कढई गरम करून त्यात मखाना हलक्या आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्याच कढईत शेंगदाणे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर त्यांची साल काढून स्वच्छ करा.
  • सफरचंदाचे छोटे तुकडे करा. केळी सोलून कापून ठेवा. खजूर बियाणे काढून तयार ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मखाना आणि शेंगदाणे घाला.
  • त्यात सफरचंद, केळी, खजूर तसेच बदाम आणि काजूचे तुकडे घालून सर्व मिश्रण बारीक वाटून घ्या.
  • तयार मिश्रणात दूध घालून पुन्हा एकदा फिरवून गुळगुळीत स्मूदी तयार करा.
  • सर्व्हिंग ग्लासमध्ये आधी भिजवलेले चिया सीड्स घाला आणि त्यावर तयार स्मूदी ओता. वरून सफरचंदाचे तुकडे आणि ड्रायफ्रूट्सने सजवून थंडगार सर्व्ह करा.
Matar Bhat Recipe: हिवाळ्यात आवर्जून बनवा अस्सल पारंपरिक पद्धतीने मटार भात, समाधान देणारा चविष्ट पदार्थ

मखाना खाण्याचे फायदे

  • मखाना हा पोषक तत्वांचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न आणि झिंक यांसारखे अनेक आवश्यक घटक आढळतात. कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.
  • हाडांच्या आरोग्यासाठी मखाना विशेष फायदेशीर आहे. त्यातील कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक शरीरातील हाडांच्या चयापचय प्रक्रियेला संतुलित ठेवण्यास सहाय्य करतात.
  • रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही मखान्याचा आहारात समावेश उपयुक्त ठरतो. नियमित प्रमाणात सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ तृप्तीची भावना राहते.

Web Title: Make healthy makhana smoothie at home best for weight loss recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Healthy Drinks
  • marathi recipe
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल ‘अमेरिकन चाॅप्सी’ची रेसिपी नोट करा
1

Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल ‘अमेरिकन चाॅप्सी’ची रेसिपी नोट करा

मुसळधार पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा गरमागरम आंबट तिखट टोमॅटो सार, वाफाळत्या भातासोबत लागेल चविष्ट
2

मुसळधार पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा गरमागरम आंबट तिखट टोमॅटो सार, वाफाळत्या भातासोबत लागेल चविष्ट

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
3

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
4

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.