Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन आजार, ज्‍यामुळे अवयवाचे नुकसान होऊ शकते, माहीत असायलाच हवे

Organ Damage Disease: दोन असे आजार आहेत, जे तुमच्या अवयवांचं पूर्ण नुकसान करू शकतात. आपल्याला अनेक आजार माहीत असतात पण त्याबाबत पूर्ण माहिती नसते. अवयवांना डॅमेज कसे होऊ शकते?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 23, 2024 | 01:13 PM
कोणते दोन आजार आहेत जे अवयव डॅमेज करतात

कोणते दोन आजार आहेत जे अवयव डॅमेज करतात

Follow Us
Close
Follow Us:

पेरिफेरल व्‍हॅस्‍कुलर डिसीज (पीव्‍हीडी) आणि पेरिफेरल न्‍यूरोपॅथी (पीएन) हे दोन आजार आहेत, ज्‍यांचे सामान्‍य जागरूकतेच्‍या अभावामुळे निदानाचे प्रमाण कमी आहे. पीव्‍हीडी व पीएन हे सामान्‍य आजार आहेत, ज्‍यांची लक्षणे समान आहेत आणि या आजारांवर उपचार न केल्‍यास गंभीर समस्‍या निर्माण होऊ शकतात, कदाचित अवयव विच्‍छेदन व स्‍ट्रोक्‍सचा त्रास होऊ शकतो. पीव्‍हीडीमुळे रक्‍तवाहिन्‍या अरूंद होतात, ज्‍यामुळे पायामध्‍ये व शरीरामध्‍ये रक्‍तपुरवठा खंडित होतो. 

मधुमेह व इतर आजारांच्‍या गुंतागूंतींमुळे मेंदू व पाठीचा कणा (पेरिफेरल नर्व्‍ह) बाहेरील नसांचे नुकसान झाल्‍यास पीएन आजार होतो. फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमधील डायबेटिक फूट अँड अँकल सर्जन डॉ. राजीव सिंग यांनी अधिक माहिती दिली आहे. 

PVD म्हणजे नक्की काय?

पीव्‍हीडी हा रक्‍ताभिसरणाशी संबंधित आजार आहे, ज्‍यामध्‍ये ब्‍लॉकेजेस्, आकडी येणे आणि रक्‍तवाहिन्‍या अरूंद होणे अशी लक्षणे आढळून येतात. पीएन आजारामध्‍ये शरीर सुन्‍न पडणे, हातापायांना मुंग्‍या येणे आणि अंगावर शहारे येणे अशी लक्षणे आढळून येतात. मधुमेह व लठ्ठपणा यांसारखे को-मोर्बिडीटीज असल्‍यास पीव्‍हीडी आणि पीएनमुळे गंभीर आरोग्‍यसंबंधित समस्‍या निर्माण होऊ शकतात. 

हेदेखील वाचा – शारीरिक संबंधादरम्यानही पुरुषांमध्ये राहील Stamina, देशी पदार्थांचा करा आहारात समावेश

काय आहे अनुभव

पेरिफेरल व्‍हॅस्‍कुलर डिसीज (पीव्‍हीडी) आणि पेरिफेरल न्‍यूरोपॅथी (पीएन) हे दोन आजार

पीएन आणि पीव्‍हीडीमुळे डायबेटिस मेलिटस असलेल्‍या रूग्‍णांमध्‍ये विच्‍छेदनाचा धोका वाढतो. नुकतेच आम्‍ही अशाच प्रकारच्‍या या केसची हाताळणी केली, ज्‍यामध्‍ये मॉरिशसमधील ५६ वर्षीय गॅरेज मेकॅनिक अहमदला (नाव बदललेले) त्‍याच्‍या उजव्‍या पायासाठी विच्‍छेदन करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला होता. तो पेरिफेरल व्‍हॅस्‍कुलर डिसीज (पीव्‍हीडी) आणि पेरिफेरल न्‍यूरोपॅथी (पीएन) आजरांनी त्रस्‍त होता, तसेच त्‍याला गेल्‍या पाच वर्षांपासून मधुमेह देखील होते. मॉरिशसमधील डॉक्‍टरांनी त्‍याला अवयव विच्‍छेदनाचा सल्‍ला दिला होता. पण, टीमने वेळेवर केलेल्‍या हस्‍तक्षेपामुळे तो विच्‍छेदन होण्‍यापासून वाचला.    

अहमदने शेअर केला अनुभव

रक्‍तप्रवाहाच्या कमतरतेमुळे अहमदला आधीच उजव्या पायाची तीन बोटे गमवावी लागली होती आणि त्याला आपला पाय गमवावा लागेल असे सांगितल्यावर आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता वाटू लागली, कारण तो एकमेव कमावता होता. त्‍याला त्याच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही असा सर्वोत्तम पर्याय पाहिजे होता, म्‍हणून तो उपचारासंदर्भात दुसऱ्या मतासाठी भारतात आला.

अहमदची तपासणी केल्यावर आमच्‍या निदर्शनास आले की त्याच्या कापलेल्या बोटांच्या शस्‍त्रक्रियेच्या जखमेवर गंभीरपणे संसर्ग झाला होता, ज्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. आम्ही पेरिफेरल अँजिओग्राफी केली आणि त्यानंतर पेरिफेरल लिम्‍ब अँजिओप्लास्टी केली, संक्रमित जखमेचा भाग काढून टाकला आणि प्रगत स्किन ग्रॅफ्टिंग तंत्रे वापरली, ज्यात नवीन त्‍वचा बसवणे आणि जखमेच्‍या वेदना कमी करणा-या थेरपीचा समावेश होता. या उपचारामुळे अहमदची जखम चार आठवड्यांत बरी झाली. आम्‍ही अनेकदा संक्रमित जखमा असलेल्या रुग्णांसाठी अशा उपचार पर्यायांची शिफारस करतो. 

हेदेखील वाचा – Introvert आहात? एकटं राहणं आवडत असेल तर व्हा सावध! 30 टक्के वाढेल Dementia चा धोका

रक्तवाहिन्या ब्लॉक 

तसेच, रक्‍तवाहिन्‍या ब्‍लॉक झाल्‍यास आम्‍ही रक्‍ताभिसरण पूर्ववत करण्‍याचा प्रयत्‍न करतो, ज्‍यामुळे पाय किंवा शरीराचा इतर कोणताही अवयव वाचवता येईल. अहमदच्‍या बाबतीत अशाच प्रकारची प्रक्रिया करण्‍यात आली. त्‍याच्‍या उजव्‍या मांडीमधील रक्‍तवाहिनी ब्‍लॉक झाली होती, ज्‍यामुळे आम्‍ही रक्‍ताभिसरण पूर्ववत करण्‍यासाठी अँजिओप्‍लास्‍टी केली, परिणामत: अवयव विच्‍छेदन करण्‍याची गरज भासली नाही. अहमदची प्रकृती सध्‍या बरी असून त्‍यांनी पुन्‍हा काम सुरू केले आहे. 

अवयव विच्छेदन कधी करतात

व्‍यक्‍तीचा जीव वाचवण्‍यासाठी डॉक्‍टरांकडे अवयव विच्‍छेदन हा शेवटचा पर्याय असतो, पण कार्यक्षम अवयव गमावल्‍याने शारीरिक विकलांगत्‍व येऊ शकते, मानसिक त्रास होऊ शकतो आणि आर्थिक खर्च देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. 

अहमदाला अशाप्रकारची स्थिती येण्‍यापासून वाचविण्यात आले. यामधून लक्षात ठेवण्‍यासारखे आहे की पीव्‍हीडी आणि पीएन या दोन्‍ही आजारांच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी संतुलित आहार आणि जीवनशैली व्‍यवस्‍थापन आवश्‍यक आहे. या दोन्‍हींपैकी एका आजारासह निदान झाल्‍यास व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या डॉक्‍टरांसोबत योग्‍य फॉलो-अप घेतला पाहिजे, तसेच आजार अधिक गंभीर होणार नाही याची खात्री घेतली पाहिजे असे मत डॉक्टरांनी मांडले. 

Web Title: 2 diseases peripheral vascular disease and peripheral neuropathy that can cause organ damage you must know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 01:13 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
2

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
3

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत
4

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.