
peptide self injection trend in america and its health impact
1.अमेरिकेत FDA-अनुमती नसलेल्या पेप्टाइड्सचे स्वतः इंजेक्शन घेण्याचा ट्रेंड सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींच्या प्रभावामुळे झपाट्याने वाढतोय.
२. डॉक्टर व तज्ञांचे मत या पेप्टाइड्सचा वैज्ञानिक पुरावा नाही, सुरक्षितता सिद्ध नाही आणि काहींवर आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांची बंदी आहे.
३. पेप्टाइड्सचे वजन कमी होणे, स्नायू वाढ, तरुण त्वचा आणि दीर्घायुष्य अशा दाव्यांवर लाखो डॉलरचा बाजार फोफावतोय, पण धोका दूर केलेला नाही.
Peptide Self injection : अमेरिकेत ( America) स्वतःला पेप्टाइड्सचे इंजेक्शन देण्याचा एक नवा ‘वेलनेस ट्रेंड’ (Wellness trends) वेगाने वाढत आहे. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स, प्रसिद्ध बायोहॅकर्स आणि काही सेलिब्रिटी यांनी या ट्रेंडला पेटवून दिले आहे. त्यांचे दावे हे इंजेक्शन्स शरीरात स्नायू वाढवतात, त्वचा तरुण ठेवतात आणि शरीर पुनरुज्जीवित करतात. मात्र, तज्ञांचा ठाम इशारा आहे की हे ट्रेंड जितके आकर्षक दिसतात, तितकेच ते धोकादायकही ठरू शकतात.
अमेरिकेत गेल्या काही वर्षांत GLP-1 वर्गातील वजन कमी करणाऱ्या औषधांची लोकप्रियता वाढली. पण ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या पेप्टाइड्सचा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे महत्त्वाचे म्हणजे ह्या इंजेक्शन्सना Ameerican FDA ने मान्यता दिलेली नाही. तरीही ते सहज उपलब्ध आहेत आणि सोशल मीडियामुळे त्यांची मागणी वाढत आहे.
हे पेप्टाइड्स अनेक वेबसाइट्सवर पावडर, लिक्विड इंजेक्शन, नाकातील स्प्रे किंवा पॅचेच्या स्वरूपात विकले जातात. बायोहॅकिंग समुदायात BPC-157 आणि TB-500 ही नावे प्रचंड चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही पेप्टाइड्सवर वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीने बंदी घातली आहे. उत्पादक कंपन्या दावा करतात की हे पेप्टाइड्स बॉडी रिपेअर, इन्फ्लेमेशन कमी करणे, त्वचेची लवचिकता सुधारणे आणि ॲथलेटिक परफॉर्मन्स वाढवणे अशा अनेक फायद्यांसाठी उपयुक्त आहेत. लोक या दाव्यांवर विश्वास ठेवू लागले आहेत आणि ‘DIY पेप्टाइड इंजेक्शन’ हा घराघरात पोहोचणारा नवा ट्रेंड झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sheikh Hasina : ‘हा बंड विद्यार्थ्यांचा नव्हता…’; सत्तेवरून हटवण्यामागे कोणाचा हात? अखेर शेख हसीना यांनी सोडले मौन
स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. एरिक टोपल या ट्रेंडबाबत गंभीर चिंता व्यक्त करतात. ते स्पष्ट सांगतात—
“या पेप्टाइड्सचे फायदे सिद्ध करणारे कोणतेही ठोस क्लिनिकल पुरावे नाहीत. दीर्घकालीन दुष्परिणाम काय असतील, हे देखील माहित नाही.”
फक्त तज्ज्ञच नव्हे, तर आरोग्य प्रशासनालाही याची चिंता आहे. FDA ने आधीच अनेक पेप्टाइड विक्रेत्यांना चेतावणी पत्रे पाठवली आहेत. कारण, मान्यताशिवाय औषधे म्हणून त्यांची विक्री करणे बेकायदेशीर आहे.
अमेरिकेतील काही राजकीय व्यक्ती आणि बायोहॅकर्स यांनीही पेप्टाइड्सना खुला पाठिंबा दिला आहे. विशेषतः रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या प्रचारामुळे पेप्टाइड्सबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. केनेडीचे सहकारी आणि बायोहॅकर गॅरी ब्रेका सारखे तज्ञ पेप्टाइड्सचे इंजेक्शन्स, स्प्रे आणि पॅचेस $350 ते $600 मध्ये विकतात. अनेक वेलनेस क्लिनिक तर संपूर्ण ‘पेप्टाइड स्टार्टर किट’ देतात त्यात डोसिंग गाईड, इंजेक्शन सिरिंज आणि कोचिंगही असते.
पेप्टाइड्स म्हणजे प्रथिनांचे लहान अणुगट. हे शरीरात हार्मोन्स, चयापचय, बरे होण्याची प्रक्रिया यांसारख्या नैसर्गिक कार्यांशी संबंधित असतात.
काही पेप्टाइड्स जसे इन्सुलिन किंवा ह्यूमन ग्रोथ हार्मोन हे FDA-मंजूर आहेत. पण इंटरनेटवरील बहुतेक पेप्टाइड्स अजिबात मंजूर नाहीत. त्यांचे बनावटपणा, शुद्धता, डोसिंग, साइड इफेक्ट्स कशाचाही ठोस डेटा नसतो. त्यामुळे त्यांचा वापर करणे हे सरळसरळ “सेलिब्रिटींच्या शब्दांवर आधारित जोखीम” आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगाने पहिली फ्रान्सच्या सुपरसॉनिक ASMPA-R ची पहिली झलक; रशियासोबत तणाव वाढत असतानाच शक्तीप्रदर्शन
तज्ञांचे स्पष्ट मत आहे की पेप्टाइड्सचे इंजेक्शन घेण्याचा ट्रेंड हा महागडा, अनियमित आणि आरोग्यासाठी धोकादायक वेलनेस उद्योगाचा एक भाग आहे.
आधुनिक औषधांचा ‘नैसर्गिक पर्याय’ म्हणून त्यांची जाहिरात केली जाते, पण प्रत्यक्षात:
परिणाम सिद्ध नाहीत
डोसिंग नियंत्रित नाही
दीर्घकालीन धोके अज्ञात आहेत
उत्पादक कंपन्या अनधिकृत आहेत
यामुळे, हा वाढता ट्रेंड अमेरिकन आरोग्य व्यवस्थेसमोर नवे प्रश्न उभे करतोय.