२० रुपयांच्या 'या' पदार्थामुळे होतील काळेभोर सुंदर केस
राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळी सणाला सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो. घरात फराळ बनवून घराच्या अंगणात सुंदर फुलांची रांगोळी, दिवे लावले जातात. याशिवाय घरातील देवांची पूजा केली जाते. दिवाळी सणाला प्रत्येकालाच सुंदर आणि उठावदार दिसायचं असत. नवीन ड्रेस, दागिने आणि मेकअप करून महिला सुंदर तयार होतात. पण बऱ्याचदा केस आणि त्वचेच्या आरोग्याकडे महिला व्यवस्थित लक्ष देत नाहीत. सणासुदीच्या काळात साफसफाई, फराळ आणि इतर गोष्टींमुळे स्वतःच्या आरोग्याकडे आणि त्वचेकडे महिलांचे कायमच दुर्लक्ष होते. त्वचेवर कोरडेपणा दिसणे, काळे डाग, केस पांढरे होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. पण वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यास केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा काळे करण्यासाठी वेगवेगळे हेअर डाय, हेअर कलर, हेअर मेहेंदी इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)
ओठांवरील मऊपणा वाढवण्यासाठी ‘हे’ घरगुती पॅक ठरतील प्रभावी, थंडगार वातावरणात ओठ राहतील कायमच गुलाबी
केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा काळे करण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. प्रदूषण, चुकीचा आहार, स्ट्रेबस आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स इत्यादींचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नैसर्गिक उपाय केल्यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचत नाही.
केस काळे करण्यासाठी बदाम, मोहरीचे तेल, कोरफड जेल इत्यादी पदार्थांचा वापर करावा. हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर बदाम भाजून घ्या. बदाम भाजल्यानंतर ते थंड करून त्यांची बारीक पावडर करा. तयार केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात बदाम तेल, मोहरीचे तेल आणि कोरफड जेल मिक्स करून घट्टसर पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट हलकीशी गरम करून घ्या. गरम करून थंड केल्यानंतर पांढऱ्या केसांवर लावा.
चेहऱ्याला उजवळण्यासाठी ‘माचा’! जपानची एक आगळी-वेगळी पद्धत
हेअर मास्क केसांवर लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे हेअर मास्क लावावा. यामुळे केस पांढरे राहणार नाहीत. याशिवाय केस मऊ आणि मुलायम होतील. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. केसांवर हेअर मास्क २ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवावा, यामुळे केस पांढरे राहणार नाहीत. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय महिन्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास केसांच्या सर्वच समस्या दूर होतील आणि केस अतिशय चमकदार दिसू लागतील.