Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ व्यसनापायी महिलांमध्ये येतंय वंध्यत्व आणि पुरूष होत आहेत नपुसंक, 3 व्यवसांपासून रहा दूर

आज असे अनेक तरुण जोडपे आहेत जे वंध्यत्वाच्या समस्येशी झुंजत आहेत आणि पालक होण्याचा आनंद उपभोगू शकत नाहीत. यासाठी तुमच्या काही सवयी जबाबदार आहेत. या सवयी अंडी आणि शुक्राणूंची गुणवत्ता खराब करतात

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 30, 2025 | 01:01 PM
पुरुष आणि महिलांमधील वंध्यत्व का वाढतेय (फोटो सौजन्य - iStock)

पुरुष आणि महिलांमधील वंध्यत्व का वाढतेय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात, पुरुष आणि महिला दोघांमध्येही वंध्यत्वाची समस्या झपाट्याने वाढत आहे. याचे कारण केवळ वय किंवा ताणतणाव नाही तर धूम्रपान, मद्यपान आणि व्हेपिंग सारख्या सवयीदेखील आहेत, ज्या तुमच्या प्रजननक्षमतेला गंभीरपणे हानी पोहोचवतात. बरेच लोक असा विचार करतात की ते बाळाची योजना आखताना या सवयी सोडून देतील, परंतु हा एक धोकादायक भ्रम आहे. 

या सवयींचा शरीरावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे अंडी आणि शुक्राणूंची गुणवत्ता खराब होते आणि गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात. प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांकडून जाणून घेऊया की वंध्यत्वाची समस्या कशी दूर करता येईल.

धूम्रपान प्रजननक्षमतेचा सर्वात मोठा शत्रू

सिगरेट पिण्यामुळे अधिक त्रास

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजू गुप्ता यांनी सांगितले की, महिलांमध्ये अंड्यांची संख्या कमी होते, फॅलोपियन ट्यूब खराब होतात आणि गर्भाशयाची कार्यक्षमता कमी होते. गर्भपात आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी (गर्भधारणा पोटाबाहेर तयार होते) होण्याचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये, शुक्राणूंची संख्या कमी होते, त्यांची गतिशीलता कमी होते आणि डीएनए खराब होते, ज्यामुळे जन्मजात दोष उद्भवू शकतात. 

केवळ धूम्रपानच नाही तर निष्क्रिय धूम्रपान (दुसऱ्याच्या धुराच्या संपर्कात येणे) देखील तितकेच हानिकारक आहे. धूम्रपानाचा परिणाम प्रजनन क्षमतेवर बराच काळ राहतो. आताच ते सोडणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. अनेकांना वाटते की बाळाचे नियोजन करण्यापूर्वी काही महिने आधी धूम्रपान सोडणे किंवा व्हेपिंग करणे हे नुकसान कमी करेल, परंतु हे चुकीचे मत आहे.

पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा

अल्कोहोल आणि व्हेपिंग (इलेक्ट्रॉनिक सिगारेट)

दारू पिणे त्रासदायक

इंदिरापुरम येथील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटरमधील प्रजनन तज्ज्ञ डॉ. नेहा त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, ‘अल्कोहोलमुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होते, ज्यामुळे ओव्हुलेशनवर परिणाम होतो आणि मासिक पाळी अनियमित होते. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते आणि शुक्राणूंची गुणवत्ता बिघडते. व्हेपिंग हे अनेकदा सुरक्षित मानले जाते, परंतु त्यात अंडी आणि गर्भाशयाच्या अस्तरांना नुकसान करणारे रसायने असतात. जर तुम्ही पालक बनण्याची योजना आखत असाल तर तुम्ही चांगले खावे, दररोज व्यायाम करावा. वाईट सवयी सोडून देणे महत्वाचे आहे. यामुळे भविष्यात तुम्हाला प्रजनन समस्या टाळता येतील.’

धूम्रपान आणि प्रजनन क्षमता

वंध्यत्वाचा त्रास

  • महिलांवर परिणाम
  • अंड्यांच्या संख्येत घट
  • फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशयाच्या ऊतींचे नुकसान
  • गर्भपात आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी (गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा) होण्याचा धोका वाढतो

पुरुषांवर परिणाम

  • शुक्राणूंची संख्या आणि गती कमी होते
  • डीएनए रचनेचे नुकसान, ज्यामुळे गर्भपात किंवा जन्मजात दोष होऊ शकतात
  • प्रजनन क्षमता चांगली ठेवण्याचे मार्ग
  • धूम्रपान, अल्कोहोल आणि व्हेपिंग ताबडतोब सोडा
  • दररोज संतुलित आहार घ्या आणि व्यायाम करा
  • तणावापासून दूर रहा आणि पुरेशी झोप घ्या
  • वेळोवेळी तुमच्या प्रजनन आरोग्याची तपासणी करा

धूम्रपान, मद्यपान आणि व्हेपिंगचा तुमच्या वैयक्तिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर ते तुमची मुले होण्याची क्षमतादेखील कमकुवत करतात. जितक्या लवकर तुम्ही या सवयी सोडाल तितके तुम्ही भविष्यासाठी चांगले तयार व्हाल. जर तुम्ही किंवा तुमचा जोडीदार बाळाची योजना आखत असाल, तर या सवयी आत्ताच सोडून देणे हा सर्वोत्तम निर्णय आहे.

10 तासांपेक्षा झोपणे ठरू शकते गंभीर, वंध्यत्व-डायबिटीससह 5 आजारांचा वाढतो धोका

Web Title: 3 habits need to quit says experts if you are planning baby affecting fertility of men and women health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • Alcohol
  • male infertility
  • smoking
  • women health

संबंधित बातम्या

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे
1

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी
2

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…
3

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

वयाच्या आठव्या- नवव्या वर्षी मुलींना मासिक पाळी का येते? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे
4

वयाच्या आठव्या- नवव्या वर्षी मुलींना मासिक पाळी का येते? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.