३४ वर्षीय अभिनेत्याचा कावीळने मृत्यू; साधा वाटणारा आजार घेऊ शकतो तुमचाही जीव, वेळीच जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे
कावीळ हा आजार आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी झाला असेलच. जर तुम्हाला वाटत असेल की हा आजार फक्त लहान मुलांना किंवा वृद्धांना अभिनेते होणार आजार आहे तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे! तुमचा हा गैरसमज मोडणारी एक धक्कादायक बातमी चित्रपटसृष्टीतून समोर आली आहे. कन्नड संतोष बलराज यांचे मंगळवारी सकाळी बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण नुकतेच समोर आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्याचे निधन हे कावीळ आजारामुळे झाले आहे…
केसांची शाईन कमी झाली आहे? पिकलेल्या केळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मुलायम
अभिनेत्याचे वय फक्त ३४ वर्षे होते आणि त्यांना मूत्रपिंडाचा गंभीर आजार होता, ज्यामुळे त्यांना गंभीर कावीळ झाली. गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची तब्येत जरा सुधारली, पण नंतर त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी मात्र त्यांची तब्बेत जरा जास्तच खालावली आणि ते कोमात गेले. आयसीयूमध्ये उपचार असूनही, त्यांच्या अवयवांनी काम करणे थांबवले आणि त्यांचा मृत्यू झाला. कावीळ हा एक सामान्य आजार आहे परंतु काही प्रकरणांमध्ये तो आपल्या आरोग्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतो. कावीळच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आपल्या जीवासाठी घातक ठरू शकते.
कावीळ म्हणजे नक्की काय?
कावीळ ही एक स्थिति आहे, ज्यामध्ये त्वचा आणि डोळ्यामधील बाह्य पांढरा भाग रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढल्याने पिवळा दिसायला लागतो. हे यकृताच्या आजाराचे लक्षण आहे. कावीळ लाल रक्तपेशींच्या जास्त विघटनामुळे किंवा यकृताच्या नुकसानामुळे होऊ शकते.
कावीळ आजार कसा ओळखायचा?
कावीळमध्ये त्वचेचा आणि डोळ्याचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. आता बऱ्याचदा हे फरक आपल्याला आपल्या डोळ्यांनी नीट दिसून येत नाही अशात तुम्ही ते डॉक्टरांकडून वेळीच तपासून घेऊ शकता. कावीळची लक्षणे किती गंभीर असू शकतात हे त्याच्या वेगावर आणि ते कशामुळे होत आहे यावर अवलंबून आहे.
कावीळची लक्षणे?
कावीळचे मुख्य लक्षण म्हणजे त्वचा आणि डोळे पिवळे दिसणे. यासोबतच गडद लघवी, फिकट रंगाचे मल, तसेच मळमळ, उलट्या, भूक न लागणे, पोटदुखी आणि थकवा येणे इत्यादी लक्षणे शरीरावर सामान्यपणे दिसून येतात. काहीवेळा ही लक्षणे सौम्य असू शकतात ज्यामुळे जराही काही जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.
कावीळ होण्याची कारणे
कावीळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात निर्माण होणारं बिलीरुबिन नावाचा पदार्थ! हा पदार्थ शरीरात जमा होऊ लागला की कावीळची समस्या जाणवू लागते. कावीळ हे एक लक्षण आहे, जे अनेक आजारांमुळे होऊ शकते, जसे की हिपॅटायटीस, सिरोसिस, किंवा पित्ताशयातील खडे.
कावीळ झाल्यावर काय खावे?
फळे, भाज्या, धान्य, पातळ प्रथिने जसे की, चिकन, मासे आणि टोफू.
कावीळ झाल्यावर काय खाणे टाळावे?
तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले आणि जंक फूड, अल्कोहोल, जास्त साखर असलेले पदार्थ.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.