ओट्सचे फायदे (फोटो सौजन्य - iStock)
सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. ओट्स, हा एक निरोगी नाश्त्याचा पर्याय आहे जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे एक प्रकारचे संपूर्ण धान्य मानले जाते, ज्यामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात.
भारतातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, जर आपण नियमितपणे नाश्त्यात ओट्स खाल्ले तर आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. ओट्स अनेकांना खायला आवडते. याचा शरीराला काय फायदा होतो ते आपण या लेखातून डॉक्टरांच्या नजरेतून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
हाय फायबर डाएट
डाएटसाठी उत्तम
ओट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी खूप फायदेशीर असते. त्यात असलेले विद्रव्य फायबर, विशेषत: बीटा-ग्लुकन, पोटात जेलसारखी रचना बनवते ज्यामुळे पचनसाठी सोपे होते. नाश्त्यात ओट्स खाल्ल्यास बद्धकोष्ठता, गॅस आणि ॲसिडिटीचा धोका कमी होतो. तसंच हे पचायला अत्यंत हलके आहे.
हृदयरोगापासून ठेवते दूर
हृदयरोगापासून ठेवेल दूर
ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचे फायबर असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. यामुळेच नाश्त्यात नियमितपणे ओट्स खाल्ल्याने हृदयविकाराच्या झटक्यासारख्या धोकादायक आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
ऊर्जेचा उत्तम सोर्स
एनर्जी बुस्टर
ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यासोबतच ओट्समध्ये प्रोटीनही पुरेशा प्रमाणात आढळते, जे स्नायूंच्या दुरुस्ती आणि विकासासाठी आवश्यक असते. नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि थकवा कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी उपयोगी
वेट लॉससाठी चांगला पर्याय
ज्या लोकांचे वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ओट्स हा उत्तम पर्याय आहे. ओट्समध्ये कमी कॅलरीज असतात, परंतु त्यात फायबर आणि प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि अधिक खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय ओट्स खाल्ल्याने चयापचय क्रियाही वाढते, ज्यामुळे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि वजनदेखील झर्रकन कमी होते.
त्वचेसाठीही उत्तम
त्वचेची काळजी घेण्यासाठी ओट्स
ओट्स फक्त खाण्यातच नाही तर त्वचेची काळजी घेण्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. ओट्सचा फेस पॅक बनवल्याने त्वचेची सूज आणि जळजळ कमी होते. याव्यतिरिक्त, ओट्समध्ये सॅपोनिन्स नावाचे नैसर्गिक स्वच्छता घटक असतात, जे त्वचेतील घाण आणि तेल काढून टाकतात.