Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबईमध्ये सर्वात पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हे ऐतिहासिक यश संपादन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 30, 2025 | 07:00 PM
कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Follow Us
Close
Follow Us:
  • शांघाय ते मुंबई: तंत्रज्ञानाने देशांमधील अंतर मिटवले! कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने रिमोट सर्जरीद्वारे बदलली उपचारांची व्याख्या
  • डॉ. टी.बी. युवराजा यांची कमाल
  • युएस एफडीए स्टडी-मान्यताप्राप्त टेली-सर्जरी प्रणालीचा यशस्वी वापर करून जटिल रिमोट रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी आणि पार्शियल नेफरेक्टॉमी ऑपरेशन केले
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक सर्जरी यशस्वीपणे करून एक ऐतिहासिक राष्ट्रीय यश संपादन केले आहे. ही सर्जरी मुंबईमध्ये दोन रुग्णांवर केली गेली, तर ऑपरेटिंग सर्जन्स डॉ टी बी युवराजा (डायरेक्टर – ग्रुप, युरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी) ५००० किलोमीटर दूर शांघायमध्ये होते. सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर, भारतात ‘तौमाई’ (Toumai) रिमोट रोबोटिक सर्जरी सिस्टीमचा हा पहिलाच, देशाच्या सीमेपलीकडे करण्यात आलेला क्लिनिकल उपयोग आहे. हे यश देशाच्या रिमोट सर्जरी मेडिकल क्षमतांमध्ये घडून येत असलेली महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते.

दोन रुग्णांवर केली प्रक्रिया 

ही ऐतिहासिक प्रक्रिया मुंबईमध्ये दोन रुग्णांवर केली गेली, ज्यामध्ये रोबोटच्या मदतीने ‘रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी’ आणि ‘पार्शियल नेफ्रेक्टॉमी’ यशस्वीपणे करण्यात आली. ही गुंतागुंतीची युरोलॉजिकल सर्जरी ५००० किलोमीटरपेक्षा जास्त दूर बसलेल्या एका तज्ञ सर्जनने रिमोटने संचालित केली. ही बाब गुंतागुंतीच्या सर्जरी मेडिकल प्रक्रियांसाठी, दूरवरून रोबोटिक वापर सुरक्षितपणे, अचूकपणे आणि विश्वसनीय पद्धतीने करता येतो हे प्रमाणित करते. 

दोन्ही सर्जरी तौमाई® (Toumai®) सिस्टीमचा उपयोग करून रिमोट पद्धतीने (दूरवरून) करण्यात आल्या, जो सध्याच्या काळात टेली-सर्जरीसाठी यूएस एफडीए स्टडीद्वारा मंजुरी मिळालेला एकमेव रोबोटिक सर्जिकल प्लॅटफॉर्म आहे. या प्रक्रियांनी वास्तविक वेळेत सर्जिकल नियंत्रण आणि उच्च अचूकता दाखवून दिली, ज्यामुळे रुग्णाच्या सुरक्षेच्या बाबतीत काहीही तडजोड न करता, भौगोलिक अंतर खूप जास्त असताना देखील यश मिळाले.

थंडीमुळे सांधे होतायत कडक? हिवाळ्यामध्ये ‘हे’ आरोग्य मंत्र तुमच्या हाडांची – सांध्यांची घेतील काळजी

सुरक्षित तंत्रज्ञानामुळे शक्य

या आंतरराष्ट्रीय सर्जरी हाय-स्पीड, स्थिर डेटा ट्रान्समिशन आणि अनेक सुरक्षित तंत्रज्ञानामुळे संभव झाल्या. या सिस्टीमने फक्त १३२ मिलीसेकंदाच्या अल्ट्रा-लो बायडायरेक्शनल लॅटेन्सीसह वास्तविक वेळेत सर्जिकल नियंत्रण सुनिश्चित केले, त्यामुळे ही प्रक्रिया त्याच अचूकतेने, सुरक्षितपणे आणि विश्वसनीयतेसह पूर्ण झाली, ज्याप्रकारे ऑन-साईट रोबोटिक सर्जरीमध्ये होते. अतिशय कमी लॅटेन्सीमुळे सर्जरीदरम्यान उपकरणांची सुरळीत हालचाल, अचूक डिसेक्शन आणि विश्वसनीय अंमलबजावणी शक्य झाली.

नवे मार्ग झाले खुले 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये युरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीचे डायरेक्टर (ग्रुप), डॉ टी बी युवराजा यांनी या सर्जरी दूरवरून केल्या. त्यांनी याआधी ४१०० पेक्षा जास्त रोबोटिक प्रक्रिया केल्या आहेत. या यशाबाबत, डॉ टी बी युवराजा यांनी सांगितले, “रिमोट रोबोटिक सर्जरीमध्ये उच्च गुणवत्तापूर्ण सर्जिकल देखभालपर्यंत पोहोच पूर्णपणे बदलण्याची क्षमता आहे. दोन मोठ्या देशांमध्ये या प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलची नावीन्य, सुरक्षा आणि रुग्णांची उत्कृष्ट देखभाल यांच्याप्रती बांधिलकी अधिक जास्त मजबूत झाली आहे. या यशाने संपूर्ण भारत आणि जगभरात जागतिक दर्जाचे उपचार प्रदान करण्याचे नवे मार्ग खुले केले आहेत.”

पहिल्यांदाच केले कमालीचे काम 

प्रक्रियेदरम्यान ‘तौमाई®’ (Toumai®) सिस्टीमने असामान्य कामगिरी बजावली आणि याचा रिमोट कंट्रोल अतिशय सुरळीतपणे, अचूकपणे आणि स्थिरपणे काम करत होता. त्यामुळे सर्जनना त्याच आत्मविश्वासाने आणि अचूकपणे गुंतागुंतीच्या प्रक्रिया पूर्ण करता आल्या, जसे प्रत्यक्षपणे होणाऱ्या रोबोटिक सर्जरीमध्ये होते. हा टप्पा सिद्ध करतो की, रिमोट रोबोटिक सर्जरी फक्त व्यवहार्यच नाहीत, तर सुरक्षित आणि क्लिनिकल दृष्टीने प्रभावी देखील आहेत. हे मोठे यश भारतामध्ये टेलिसर्जरीचे एक नवे युग सुरु होत असल्याचा संकेत आहे, जिथे आता भौगोलिक अंतर जागतिक दर्जाच्या सर्जिकल तज्ञ क्षमतांपर्यंत पोहोच मिळवण्याच्या आड येत नाहीत आणि तंत्रज्ञानावर आधारित आरोग्य सेवा रुग्णांपर्यंत कधीही पोहोचू शकतात.

सोरायसिस नक्की का होतो? लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

नवी व्याख्या रचली 

राष्ट्रीय स्तरावरील अशी यशस्वी कामगिरी पहिल्यांदाच बजावून, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने शस्त्रक्रियेच्या पद्धतीची नवी व्याख्या रचण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. ५,००० किलोमीटरहून अधिक अंतरावरून यशस्वी शस्त्रक्रिया सुनिश्चित करून, ‘तौमाई®’ प्रणालीने रिमोट आणि स्मार्ट शस्त्रक्रियेसाठी एक नवीन मानक स्थापित केले आहेत. या दोन्ही प्रक्रियांचे यश केवळ टेलिसर्जरीच्या क्षमतेला मान्यता देत नाही तर भारत आणि जगभरातील रिमोट आरोग्य सेवा प्रणालींच्या भविष्यातील विकासासाठी मौल्यवान क्लिनिकल अनुभव देखील प्रदान करते.

भारतातील सर्वात पहिले रुग्णालय 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, “सीडीएससीओने तौमाई® प्रणालीला मान्यता दिल्यानंतर, आंतरखंडीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करणारे भारतातील पहिले रुग्णालय बनणे ही आमच्या हॉस्पिटलसाठी आणि भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. ही ऐतिहासिक कामगिरी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आणि भारतातील शस्त्रक्रिया काळजीचे भविष्य घडवण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या नेतृत्वाला आणखी बळकटी देते.” ते पुढे म्हणाले, “सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधांना प्रगत रोबोटिक्सची जोड देऊन, रुग्णालयाने हे दाखवून दिले आहे की परिणामांशी तडजोड न करता जगाच्या विविध भागांमध्ये तज्ज्ञ शस्त्रक्रिया कौशल्य पोहोचवता येते. ही कामगिरी नवनवीन तंत्रज्ञान, रुग्णांची सुरक्षा आणि क्लिनिकल उत्कृष्टतेप्रती आमची दीर्घकालीन वचनबद्धता दर्शवते. यामुळे प्रगत सर्जिकल देखभालीची उपलब्धता वाढवण्यासाठी नवीन शक्यतांचे दरवाजे खुले होतात, विशेषतः दुर्गम आणि वंचित भागातील रुग्णांसाठी हे विशेष लाभकारी ठरत आहे.”

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे पूर्णवेळ तज्ज्ञ, हॉस्पिटल कर्मचारी, तांत्रिक सहयोगी आणि मुंबई आणि शांघाय येथील अभियांत्रिकी टीम्ससह मल्टी-डिसिप्लिनरी क्लिनिकल टीममधील समन्वय आणि सहकार्यामुळे या प्रक्रियांची यशस्वी अंमलबजावणी शक्य झाली. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे अखंड कनेक्टिव्हिटी, कठोर सुरक्षा प्रोटोकॉल आणि निर्दोष क्लिनिकल अंमलबजावणी सुनिश्चित झाली.

Web Title: India s first cross border robotic surgery was successfully performed at kokilaben dhirubhai ambani hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • health care news
  • Health News

संबंधित बातम्या

Oral cancer Risk : महुआ, खर्रा, ताडीचे मद्य सुरक्षित नाही; तोंडाच्या कर्करोगाचा धोक्यात 45 टक्क्यांनी वाढतो
1

Oral cancer Risk : महुआ, खर्रा, ताडीचे मद्य सुरक्षित नाही; तोंडाच्या कर्करोगाचा धोक्यात 45 टक्क्यांनी वाढतो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.