स्टॅमिना वाढविण्यासाठी काय खावे
रोमँटिक नात्यात शारीरिक संबंध हा एक अर्थपूर्ण घटक असू शकतो. पण कधी कधी थकवा,अधिक ताण किंवा तणाव तुम्हाला त्या क्षणांचा आनंद घेऊ देत नाही. ज्याचा प्रभाव हळूहळू तुमच्या नात्यावर दिसू लागतो. अनेक वेळा, पोषक तत्वांचा अभाव आणि चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींचा परिणाम तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या शारीरिक संबंधाच्या कामगिरीवर होतो आणि हे सत्य आहे.
सध्या अनेक कपल्समध्ये हा ताण दिसून येतो आणि यावर सर्व प्रकारची औषधे शोधण्यास सुरुवात केली जाते. मात्र तुमचा आहार तुमच्या शारीरिक संबंधाच्या समस्यांवर उपाय ठरू शकतो. म्हणून, आपल्या आहाराकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की स्टॅमिना पॉवर वाढवण्यासाठी काय खावे? असे काही पदार्थ आहेत जे तुमचा बेडवरील स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जेणेकरुन तुम्ही आपल्या जोडीदारासह जास्त वेळ आणि अधिक उर्जेसह शारीरिक संबंध ठेऊ शकता (फोटो सौजन्य – iStock)
पदार्थांचा होतो लैंगिक क्षमतेवर परिणाम
तुम्ही लैंगिक क्षमता वाढवणारे पदार्थ शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. खरं तर, पोषक तत्वांनी युक्त अन्न सेवन केल्याने शरीरात पुरेशा प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. लैंगिक संप्रेरकांचे स्राव आणि लैंगिक अवयवांना उत्तेजन देण्यासाठी पोषक तत्वेदेखील मदत करतात.
जे लोक योग्य पोषक तत्वांची काळजी घेत नाहीत त्यांच्यात इतरांच्या तुलनेत कामवासना आणि शारीरिक संबंधादरम्यान तग धरण्याची क्षमता कमी असते. तर, योग्य अन्नपदार्थ खाणाऱ्या व्यक्तीमध्ये अशी कोणतीही तक्रार आढळत नाही.
योग्य पोषक आणि अन्नपदार्थ शरीरातील रक्तप्रवाह योग्यरित्या नियंत्रित करण्यास मदत करतात, ज्यामुळे ऑक्सिजनची योग्य मात्रा इंटिमेट एरियामध्ये पोहोचते. कामवासना वाढवण्यासाठी हे आवश्यक आहे असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
केळं
नियमित केळे खाल्ल्याने वाढेल स्टॅमिना
केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याच वेळी, शरीरातील सर्व कार्ये योग्यरित्या व्हावी यासाठी केळं मदत करते. हे हृदय, नसा आणि स्नायूंचे योग्य आकुंचन प्रक्रिया राखते. पुरुषांमध्ये लिंग कठोर होण्यासाठी आणि स्त्रियांमध्ये कामोत्तेजनापर्यंत पोहोचण्यासाठी वर दिलेले सर्व घटक आवश्यक आहेत.
केळ्यामुळे रक्तदाब सामान्य आणि संतुलित ठेवण्यास मदत मिळते आणि संपूर्ण हृदयाच्या आरोग्यासाठी याचा फायदा होतो. ज्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान दोन्ही व्यक्ती व्यवस्थित आनंद घेऊ शकतात आणि केळ्याचा समावेश स्टॅमिना वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो
शारीरिक संबंधादरम्यानही पुरुषांमध्ये राहील Stamina, देशी पदार्थांचा करा आहारात समावेश
पालक
पालकच्या भाजीचा समावेश करून घ्या
पब मेड सेंट्रलच्या मते पालकामध्ये फोलेट भरपूर असते. फोलेट रक्तप्रवाहाला चालना देण्यास मदत करते, तर त्यात मॅग्नेशियम देखील आढळते, जे शरीरात लैंगिक हार्मोन्सचा प्रोत्साहन देते. जेणेकरुन दोन्ही पार्टनर अधिक उत्साही होतील आणि जास्त वेळ एकमेकांना अंथरूणात सुख देऊ शकतील
लसूण
आहारात करा लसणाचा समावेश
तुम्हाला जर उत्तम लैंगिक जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, तर लसणाला तुमच्या आहाराचा एक भाग बनवा. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, लसणात ॲलिसिन नावाचे एक संयुग आढळते, जे रक्तवाहिन्यांच्या विस्तारास प्रोत्साहन देते. हे नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन देखील वाढवते. त्याच्या सेवनाने Intimate Area मध्ये रक्त प्रवाह वाढतो, विशेषत: ते पुरुषाच्या जननेंद्रियामध्ये रक्तप्रवाह वाढवते. त्याच वेळी, रक्ताभिसरण वाढल्यामुळे लैंगिक स्टॅमिनाही आपोआप वाढतो
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट खाण्याची सवय लावा
अनेकांना डार्क चॉकलेट खायला आवडत नाही, पण त्यामुळे तुमचे लैंगिक आयुष्य वा शारीरिक संबंध खूप सुंदर होऊ शकतो. डार्क चॉकलेटचे नियमित सेवन करा, त्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात.
रक्ताभिसरण सुधारल्याने लैंगिक क्रियाकलापांवर सकारात्मक परिणाम होतो आणि स्त्री आणि पुरुष दोघांचाही स्टॅमिना सुधारण्यास मदत मिळते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही डार्क चॉकलेटमध्ये स्ट्रॉबेरी बुडवून खाऊ शकता, कारण अँटिऑक्सिडंट समृद्ध डार्क चॉकलेटसोबत व्हिटॅमिन सी चे मिश्रण कपल्समधील शारीरिक संबंधाच्या आकर्षणाला अधिक चालना देऊ शकते.
पुरुषांच्या शरीरात खरा Stamina आणि उत्साह भरेल हे फळ, मुळापर्यंत पोहचेल विटामिन, सळसळेल रक्त
भोपळ्याच्या बिया
नियमित भोपळ्याच्या बिया खा
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, भोपळ्याच्या बिया झिंक आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडने समृद्ध असतात. हे दोन्ही पोषक तत्व लैंगिक हार्मोन्स उत्तेजित करण्यास मदत करतात. रसायने असलेल्या औषधांच्या विपरीत, भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन कोणत्याही दुष्परिणामांशिवाय लैंगिक शक्ती वाढवू शकते. स्नॅक म्हणून तुम्ही भाजलेल्या भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करू शकता.
डाळिंबाचे सेवन
नाश्त्यात डाळिंबाचा समावेश करा
डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने ऊर्जा सुधारण्यास मदत होते. जास्त वेळ बेडवर आपल्या जोडीदारासह राहण्यासाठी उत्साहासोबत पुरेशी उर्जादेखील आवश्यक असते. शिवाय डाळिंबाचे दाणे तुमची लैंगिक शक्तीदेखील वाढवते. डाळिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. जे हृदयाचे आरोग्य आणि इरेक्शन सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे, पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तुमच्या इंटिमेट एरियामध्ये पोहोचतो आणि तुम्हाला उत्तेजन देण्यास मदत करतो
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.