Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Health News: देशातील ५२ टक्के गर्भवती महिला रक्तक्षयाने ग्रस्त; राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

देशात गर्भवतींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. गर्भ काळात आरोग्य व पोषण योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही. त्यामुळे गर्भवतीच्या आरोग्यावर व प्रसूतीवर गंभीर परिणाम दिसून येतात.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 04, 2026 | 10:37 AM
Women Health News: देशातील ५२ टक्के गर्भवती महिला रक्तक्षयाने ग्रस्त; राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल
Follow Us
Follow Us:
  • देशातील ५२ टक्के गर्भवती महिला रक्तक्षयाने ग्रस्त
  • तपासणीत राज्यात ४ हजार गर्भवतींना तीव्र रक्तक्षयाचे निदान
  • तपासणीत राज्यात ४ हजार गर्भवतींना तीव्र रक्तक्षयाचे निदान
Maternal Health Mission 2026:   महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भवतींची हिमोग्लोबीन पातळी तपासून त्यांच्या रक्तवाढीसाठी लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे, त्याचा राज्यातील गर्भवती महिलांना मोठा लाभहोणार आहे. देशात एकूण गर्भवतींपैकी सुमारे ५२ टक्के महिला रक्तक्षयाने ग्रस्त आढळून येतात. रक्तक्षयामुळे मातेच्या आरोग्यावर व प्रसूतीवर गंभीर परिणाम दिसून येतात. अनेक वेळा माता अथवा बालमृत्यूचे हे महत्त्वाचे कारण ठरते, असे आढळून आले आहे. (Health News)

देशात गर्भवतींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. गर्भ काळात आरोग्य व पोषण योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही. त्यामुळे गर्भवतीच्या आरोग्यावर व प्रसूतीवर गंभीर परिणाम दिसून येतात. एकूण रक्तक्षय असणाऱ्या गर्भवतींपैकी ३ ते ५ टक्के मातांना तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय आढळून येतो. अशा तीव्र रक्तक्षय आढळणाऱ्या सर्व गर्भवतींची हिमोग्लोबीन पातळी तपासण्यात येणार आहे. त्यांना गरजेनुसार वैद्यकीय देखरेखीखाली रक्तवाढीसाठी लसीद्वारे आयर्न सुक्रोज अथवा फेरिक कार्बोक्सीमाल्टीज देण्याची, मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे.

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

तपासणीत राज्यात ४ हजार गर्भवतींना तीव्र रक्तक्षयाचे निदान

७८ रक्तक्षय तपासणी या मोहिमेतर्गत राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये १ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान गर्भवतीची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ४ हजार ३७२ गर्भवतींना तीव्र रक्तक्षयाचे निदान झाले आहे. त्यांपैकी ३ हजार ९६३ गर्भवतीना आयनं सुक्रोज अथवा फेरिक कार्बोक्सीमाल्टीजची लस देण्यात आली. या गर्भवतींच्या रक्तपातळीत अपेक्षित वाढ होईपर्यंत आवश्यक तपासण्या व पाठपुरावाही आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. – डॉ. भगवान पवार, आरोग्य उपसंचालक

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्री

मातांना सरकारकडून मोफत उपचार मिळणार

या मोहिमेत गर्भवतींची चौथ्या महिन्यानंतर तपासणी करून तीव्र स्क्तक्षय असणा-या मातांना शासकीय आरोग्य संस्थेत मोफत उपचार देण्यात यंत आहेत. काही गरजू मातांना रक्तसंक्रमण करून उपचार दिला जातो, या उपचारपद्धतीमुळे रक्तपातळीत वाढ होऊन मुदतीआधीची प्रसूती प्रसूतिपश्चात रक्तस्राव अशी गुंतागुंत कमी होऊन मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. याशिवाय गर्भवती मातेला चौरस लोहयुक्त आहार, वैयक्तिक स्वच्छता, वेळेत सर्व तपासण्या व संदर्भ सेवा यासाठी समुपदेशनही करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

 

Web Title: Anemia prevention in pregnant women state governments new campaign for pregnant women suffering from anemia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Health News
  • State Governments
  • women health

संबंधित बातम्या

न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती
1

न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
2

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.