Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३८१ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. हर्निया, क्लेफ्ट लिप यासह इतर २२,५३९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2026 | 02:35 AM
Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
Follow Us
Follow Us:

राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
“अरुणोदय” सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान
२८ फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी अत्यंत उत्साहवर्धक

मुंबई: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात वेगाने राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सर्व मोहिमा युद्धपातळीवर सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी अत्यंत उत्साहवर्धक आहे.

“अरुणोदय” सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान

१५ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या “अरुणोदय” सिकलसेल अभियानांतर्गत गृहभेटीद्वारे ७३ लाख ४५ हजार २६६ व्यक्तींची (वय ० ते ४० वर्षे) नोंद करण्यात आली. यापैकी ५३ लाख ४७ हजार ९३३ व्यक्तींची तपासणी पूर्ण झाली असून १,६४५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. तसेच २७,११२ नवीन वाहक आढळून आले आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३८१ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. हर्निया, क्लेफ्ट लिप यासह इतर २२,५३९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

“विकसित होणार उपचार पद्धती…”, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी मल्टीपल स्क्लेरोसिसमध्ये प्रतिबंधात्मक अपंगत्वावर चर्चा

गरोदर मातांना आयव्ही आयर्न उपचार

तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांसाठी १ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष उपचार मोहीम राबविण्यात आली. ५,२३१ मातांमध्ये तीव्र रक्तक्षय निश्चित करण्यात आला असून त्यापैकी ४,५८० मातांना इंजेक्शन आयर्न सुक्रोज व फेरिक कार्बोक्सी माल्टोज उपचार देण्यात आले आहेत.

हत्तीरोग शस्त्रक्रिया व सार्वत्रिक औषधोपचार मोहीम

हत्तीरोग (अंडवृद्धी) निर्मूलनासाठी ९९३ पात्र रुग्णांपैकी जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ६०१ रुग्णांवर शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. यात गडचिरोली येथे २१६ तर चंद्रपूर येथे १३० शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेंतर्गत (एमडीए) ३३ लाख २२ हजार ६७९ पात्र लोकसंख्येपैकी २९ लाख ४१ हजार ५५४ जणांनी औषधसेवन केले असून एकूण कव्हरेज ८८.५३ टक्के इतके झाले आहे.

मलेरिया मुक्त गडचिरोली अभियान

गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी २९ हायरिस्क प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८४,७३२ LLIN लाँग लास्टींग इनसेक्टीसायड नेट (एलएलआयएन) मच्छरदाण्यांचे वितरण करण्यात आले. यात आश्रमशाळांसाठी १२,२१७ तर हायरिस्क क्षेत्रासाठी ७२,५१५ मच्छरदाण्यांचा समावेश आहे. आयसीएमआर – एनआयएमआरच्या सहकार्याने सहा संशोधन प्रकल्पही राबविण्यात येत आहेत.

क्षयरुग्णांना फूड बास्केट वितरण

क्षयरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत राज्यात ३६,५०७ निक्षय मित्रांची नोंदणी झाली असून १ लाख ५७ हजार ९०४ रुग्ण उपचाराधीन आहेत. यापैकी १ लाख १२ हजार ८३८ रुग्णांची संमती घेऊन ३७,५८७ अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले आहे.

‘राज्यात 604 ‘आपला दवाखाना’ सुरू, उर्वरित 96 दवाखाने…’; आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

कुष्ठरुग्ण सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार

राज्यात १६,७६१ कुष्ठरुग्ण उपचाराधीन असून ४ लाख ४७ हजार २९६ सहवासितांची नोंदणी झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३ लाख २५ हजार ४६० जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले. त्यानंतर २६ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आणखी ४२,००१ जणांना अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहे.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम

१ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत उच्च रक्तदाबासाठी २५ लाख ८२ हजार ९९२ जणांची तपासणी झाली, त्यापैकी १० लाख ५ हजार ७०४ जणांना निदान व उपचार सुरू करण्यात आले. मधुमेहासाठी १२ लाख ५२ हजार ४३४ तपासण्या होऊन २ लाख ८८ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मौखिक, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासण्याही मोठ्या प्रमाणात पार पडल्या असून संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

नवीन आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याचा संकल्प

राज्यात पूर्णपणे बांधकाम झालेल्या नवीन आरोग्य संस्थांना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व संस्था कार्यान्वित करण्याचा शासनाचा दृढ संकल्प आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नागरिकांना आरोग्य विभागामार्फत यापुढेही राबविण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Health campaigns in maharashtra are receiving enthusiastic response from citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Health News
  • Maharashtra Government
  • Maharashtra Health Department

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
1

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम
2

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा
3

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा
4

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.