Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील 8 अद्भुत मंदिर जिथे प्रसादात दिला जातो डोसा, चायनिज आणि उंदराचं उष्ट अन्न

भारतातील काही मंदिरं त्यांच्या वेगळ्या प्रसादासाठी प्रसिद्ध आहेत. कुठे देवाला चॉकलेट अर्पण केली जाते, तर कुठे डोसा, नूडल्स किंवा खास लाडूचा नैवेद्य दिला जातो. जाणून घ्या अशा अनोख्या मंदिरांबद्दल.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 08:42 AM
देशातील 8 अद्भुत मंदिर जिथे प्रसादात दिला जातो डोसा, चायनिज आणि उंदराच उष्ट अन्न

देशातील 8 अद्भुत मंदिर जिथे प्रसादात दिला जातो डोसा, चायनिज आणि उंदराच उष्ट अन्न

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक धार्मिक मंदिरं आहेत.
  • प्रत्येक मंदिराची आपली अशी काही खासियत असते.
  • आज आपण मंदिरांच्या अनोख्या प्रसादाविषयी जाणून घेणार आहोत.
भारताला मंदिरांचा देश म्हटलं जातं. देशाच्या प्रत्येक गल्लीत-नुक्कड्यावर एखादं मंदिर आपली वेगळी ओळख घेऊन उभं दिसतं. प्रत्येक मंदिराशी एखादी रंजक परंपरा किंवा कथा जोडलेली असते. मंदिरात दिला जाणारा प्रसादही अनेकदा त्या परंपरेशी संबंधित असतो. साधारणपणे लाडू, पेढे किंवा हलवा असा प्रसाद आपण पाहतो. पण देशात काही अशी मंदिरंही आहेत जिथे डोसा, चॉकलेट किंवा अगदी नूडल्ससारख्या अनोख्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर जाणून घेऊया भारतातील काही मंदिरं आणि त्यांचा खास प्रसाद.

महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक खास गिफ्ट, भारतात एकट्याने फिरण्यासाठी सुरक्षित आहेत ही 5 ठिकाणं

केरळमधील मुरुगन मंदिर

केरळमधील अलप्पुझा येथे असलेले ‘थेक्कन पझानी बालामुरुगन’ मंदिर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडतं ठिकाण आहे. या मंदिरात भगवान मुरुगन यांना लाडू किंवा फळांचा नैवेद्य न देता चॉकलेट अर्पण केली जाते. भक्त येथे चॉकलेटचे बॉक्स घेऊन येतात आणि प्रसाद म्हणूनही चॉकलेटच मिळते.

चेन्नईजवळील अझगर मंदिर

मदुरैजवळ असलेल्या या मंदिरात भगवान विष्णूच्या अवताराला डोसा अर्पण केला जातो. हा साधा डोसा नसून विविध धान्यांपासून बनवलेला खास प्रकारचा डोसा असतो. तो तुपात तयार केला जातो आणि देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.

कोलकात्याचे चायनीज काली मंदिर

कोलकात्यात कालीमातेची पूजा खूप प्रसिद्ध आहे. टांगरा भागातील ‘चायनीज काली मंदिर’ विशेष चर्चेत असते. येथे देवीला नूडल्स, फ्राईड राईस आणि मंचुरियनसारखे चायनीज पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. त्यामुळे या मंदिराचा प्रसाद खूप वेगळा मानला जातो.

बीकानेरचे करणी माता मंदिर

राजस्थानमधील बीकानेर येथे असलेले करणी माता मंदिर ‘उंदीर मंदिर’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरात हजारो उंदीर मुक्तपणे फिरताना दिसतात. येथे उंदरांनी स्पर्श केलेला किंवा खाल्लेला प्रसाद पवित्र मानला जातो आणि तोच भक्तांना दिला जातो.

पुरीचे जगन्नाथ मंदिर

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराची स्वयंपाकघर व्यवस्था जगातील सर्वात मोठ्या मंदिर स्वयंपाकघरांपैकी एक मानली जाते. येथे ‘छप्पन भोग’ म्हणून प्रसिद्ध असलेला प्रसाद तयार केला जातो. मातीच्या भांड्यांत लाकडाच्या आगीत बनवलेले भात, डाळ, भाज्या आणि इतर अनेक पदार्थ देवाला अर्पण केले जातात.

गुवाहाटीचे कामाख्या देवी मंदिर

आसाममधील कामाख्या देवी मंदिरात दरवर्षी ‘अंबुबाची मेला’ भरतो. या काळात मंदिर तीन दिवस बंद ठेवले जाते. चौथ्या दिवशी भक्तांना प्रसाद म्हणून खाण्याचा पदार्थ न देता लाल रंगाचा ओलसर कापड दिला जातो, ज्याला ‘रक्त वस्त्र’ म्हणतात. हे अत्यंत पवित्र मानले जाते.

तिरुपती बालाजीचा लाडू

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराचा लाडू जगप्रसिद्ध आहे. या लाडूला ‘GI Tag’ मिळाला आहे, म्हणजे हा खास प्रकारचा लाडू फक्त तिरुपती मंदिरातच तयार होतो. बेसन, तूप आणि सुका मेवा वापरून बनवलेला हा लाडू आकाराने मोठा आणि चवीला अतिशय स्वादिष्ट असतो.

कमी बजेटमध्ये करा अयोध्या, काशी आणि गंगा सागरचे दर्शन; जाणून घ्या संपूर्ण टूर पॅकेज

वृंदावनचा बालभोग

वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात सकाळच्या आरतीनंतर ‘बालभोग’ म्हणून कचोरी आणि दहीचा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद भक्त मोठ्या श्रद्धेने ग्रहण करतात. भारतभरातील ही मंदिरं आणि त्यांचे अनोखे प्रसाद आपल्या धार्मिक परंपरांची विविधता आणि वैशिष्ट्य अधोरेखित करतात. प्रत्येक मंदिराची परंपरा वेगळी असली तरी भक्तांची श्रद्धा मात्र सर्वत्र एकसारखीच दिसते.

Web Title: 8 temples of india where dosa chowmein are served as prasad travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Religious Places
  • travel news
  • Weird News

संबंधित बातम्या

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
1

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
2

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
3

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
4

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.