हार्ट अटॅक येण्याच्या आठवडाभर आधी महिलांच्या शरीरात दिसून येतात 'हे' महाभयानक बदल
जगभरात हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जीवनशैलीतील बदल, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, धूम्रपान इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. शरीरात जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक करून टाकतो. ज्यामुळे रक्तप्रवाहात आणि ऑक्सिजन पुरवठ्यात अनेक अडथळे निर्माण होतात. हार्ट ब्लॉकेज, हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. सतत काम आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात. पण असे न करता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक ठरेल प्रभावी, चरबीचे टायर होतील गायब
महिला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक वेगवेगळे चुकीचे अर्थ काढतात. ज्यामुळे योग्य वेळी आजाराचे निदान होत नाही. महिलांमध्ये हार्ट अटॅकची अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिलांना हार्ट अटॅक येण्याच्या आठवडाभर आधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
छातीमध्ये दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण असे न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. छातीमध्ये वेदना वाढणे, छाती भरून आल्यासारखे वाटणे, छातीवर दाब आल्यासारखे वाटणे, घट्टपणा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
मानवी शरीरात थकवा येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी वेगवेगळ्या प्रकारचा थकवा जाणवू लागतो. थोडस काम केल्यानंतर लगेच थकून जाणे, सतत अशक्तपणा, थोडस चालल्यानंतर लगेच दम लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला देतात. महिलांना हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात सतत थकवा जाणवू लागतो.
जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा लगेच अंघोळ करत असाल तर थांबा! जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य वेळ
महिलांना हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी अपचन, मळमळ, उलटी, पोट फुगणे इत्यादी पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या वाढू लागल्यानंतर लिंबू पाणी किंवा थंड पेयांचे सेवन केले जाते. तर काहींना अचानक घाम येणे, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत मायोकार्डियल इन्फ्रक्शन (Myocardial infarction) म्हणतात, तेव्हा येतो जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि ते ক্ষতিগ্রস্ত होतात किंवा मरतात.
हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे?
तत्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवा.108, 102 किंवा 112 यांसारख्या आपत्कालीन क्रमांकांवर कॉल करा.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काय करावे?
नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, धूम्रपान आणि मद्यपान टाळा, तणावाचे व्यवस्थापन करा, नियमित आरोग्य तपासणी करा.